कुठेही गाठून काम मागायचे...
विशाल भारद्वाज यांनी कबूल केलं की, नानांसोबत काम न करणं ही त्यांचीच चूक होती. "लोक नानांना घाबरतात, पण प्रत्यक्षात ते फणसासारखे आहेत, वरून जरी कडक असले तरी आतून खूप मऊ मनाचे आहेत," असं विशाल म्हणाले. गंमत म्हणजे, नाना पाटेकर स्वतः विशाल भारद्वाज यांच्याकडे कामाचा तगादा लावायचे. विशाल यांनी आठवण सांगितली की, "नाना मला कुठेही भेटले की हक्काने विचारायचे, 'अरे, मी नाना पाटेकर आहे, अभिनेता आहे, मला कधी कास्ट करणार?' मला खूप संकोच वाटायचा, पण माझ्याकडे त्यांच्या उंचीला साजेसा रोल नव्हता. अखेर २० वर्षांनंतर 'ओ रोमियो'च्या रूपाने तो मुहूर्त सापडला."
advertisement
अफगाणिस्तानी मॉडेल महादेवाची भक्त? मुस्लिम असूनही लावते 'शंकर' आडनाव, खरं प्रेम शोधायला गाठलं भारत
ट्रेलर लॉन्चमधील एक्झिटवर विशालचं उत्तर
काही दिवसांपूर्वी 'ओ रोमियो'च्या ट्रेलर लॉन्च वेळी नाना पाटेकर कार्यक्रमाला वेळेवर पोहोचले होते, पण त्यांना बराच वेळ ताटकळत ठेवल्यामुळे ते कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच निघून गेले होते. यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. यावर भाष्य करताना विशाल भारद्वाज हसत म्हणाले, "नाना म्हणजे वर्गातल्या त्या खोडकर मुलासारखे आहेत, जो शिक्षकांना सर्वात जास्त त्रास देतो पण सर्वात जास्त हसवतोही. आम्ही त्यांना उगाच वाट पाहायला लावली, त्यामुळे ते निघून गेले यात काहीच गैर नाही. तोच तर त्यांचा अस्सल 'नाना स्टाईल' स्वॅग आहे."
बॉक्स ऑफिसवर 'रोमियो'ची घोडदौड
शाहीद कपूर, तृप्ती डिमरी आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांतच २०.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या सिनेमात दिशा पटानी आणि तमन्ना भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अॅक्शन आणि रोमान्सने भरलेला हा चित्रपट नाना पाटेकरांच्या उपस्थितीमुळे एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.
