TRENDING:

Numerology: सोमवती अमावस्येचा दिवस कोणासाठी कसा? मूलांक 1 ते 9 दैनिक अंकज्योतिष

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी 2026 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक)
News18
News18
advertisement

आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. खासकरून व्यापारी वर्गाला सरकारकडून एखादा मोठा करार मिळू शकतो, ज्याचा भविष्यात चांगला आर्थिक लाभ होईल. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल असून सकारात्मक निकाल मिळतील. पूर्वजांच्या आशीर्वादाने धनप्राप्तीचे योग आहेत.

अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)

advertisement

पैशांच्या बाबतीत आजचा दिवस नेहमीपेक्षा कितीतरी पतीने चांगला असेल. अचानक झालेला धनलाभ तुमचं मन प्रसन्न करेल. व्यवसायातही प्रगतीची लक्षणं आहेत. आज सोन्यामध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगलं असेल आणि तुम्ही जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधू शकाल.

अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचं म्हणणं ऐकून घेतील. कुटुंबात सर्व काही सामान्य असेल, फक्त जोडीदाराशी असलेले संबंध अधिक सुधारण्यावर भर द्या.

advertisement

महाशिवरात्रीपासून 4 राशींचा भाग्याचा काळ सुरू! कुंभसहित या राशींचे नशीब चमकणार

अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)

आजचा दिवस थोडा धावपळीचा आणि समस्यांचा असू शकतो. पैशांची चणचण तुम्हाला सतावू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, एखादा जुना आजार डोकं वर काढण्याची शक्यता आहे. उपाय म्हणून आज शिवलिंगावर काळे तीळ टाकून पाणी अर्पण केल्यास त्रासातून थोडी सुटका मिळेल. कुटुंबात मात्र वातावरण चांगलं असेल.

advertisement

अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)

तुमच्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. व्यवसायात प्रगती होईल आणि नवीन संधी चालून येतील. आर्थिक बाबतीत दिवस मध्यम असेल. आज एखाद्या मोठ्या गुंतवणुकीमुळे थोडी चणचण भासू शकते. घरातील सदस्य तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि जोडीदारासोबतचा दिवस नेहमीप्रमाणे पार पडेल.

अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)

advertisement

व्यावसायिक योजनांना आज गती मिळेल. तुमचं सकारात्मक वागणं तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल. व्यवसायाचा विस्तार करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घेतल्यास तो नक्कीच फायदेशीर ठरेल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक निर्णयामध्ये घरचे लोक तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहतील.

अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)

आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सरकारी कामात किंवा कार्यालयात कर्मचाऱ्यांशी वाद घालणं टाळा, नाहीतर तुमचा अहंकार कामात अडथळा ठरू शकतो. संयम आणि नम्र भाषा वापरणं आज गरजेचं आहे. तुमच्या वागण्यामुळे कुटुंबात नाराजी निर्माण होऊ शकते, त्यामुळे जोडीदाराशी बोलतानाही काळजी घ्या.

सोमवती अमावस्येपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ

अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक)

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा सावधगिरीचा आहे. पैशांच्या बाबतीत नवीन गुंतवणूक करणं टाळा, अन्यथा पैसे अडकून पडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळून शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज संयम आणि मृदू भाषा वापरणं तुमच्या हिताचं असेल. जोडीदाराशी किरकोळ कारणावरून भांडण होणार नाही याची काळजी घ्या.

अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आंब्याची होतीये फळगळ, टाळण्यासाठी करा हे 5 प्रभावी उपाय, होईल फायदा
सर्व पहा

आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असून एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा मंगल कार्य ठरण्याचे योग आहेत. जोडीदारासोबतचा वेळ खूप मजेत जाईल. आज तुम्ही कुटुंबासोबत खूप आनंदी आणि समाधानी असाल.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: सोमवती अमावस्येचा दिवस कोणासाठी कसा? मूलांक 1 ते 9 दैनिक अंकज्योतिष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल