T20 World Cup : वानखेडेवर जगाला दाखवून दिलं, इंग्लंडची धडधड वाढवणारे नेपाळचे 5 'बहादूर'!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या थरारक सामन्यात इंग्लंडचा रडत खडत विजय झाला आहे. इंग्लंडने दिलेलं 185 रनचं आव्हान पार करायला आलेल्या नेपाळचा फक्त 4 रननी पराभव झाला आहे.
advertisement
1/6

इंग्लंडच्या 185 रनचा पाठलाग करण्यासाठी आलेली नेपाळची टीम शेवटच्या बॉलपर्यंत मॅचमध्ये होती. शेवटच्या ओव्हरमध्ये नेपाळला विजयासाठी 10 रनची गरज होती, पण सॅम करनने फक्त 5 रन दिले.
advertisement
2/6
नेपाळचा खेळाडू लोकेश बाम शेवटच्या बॉलपर्यंत झुंज देत राहिला. लोकेश बामने 20 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी केली, ज्यात 4 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. लोकेश बाम नेपाळला विजय मिळवून देत वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर करेल, असं वाटत होतं, पण नेपाळचा विजय थोडक्यात हुकला.
advertisement
3/6
इंग्लंडने दिलेल्या 185 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेला नेपाळचा ओपनर कुशल भुरटेलने सुरूवातीपासूनच इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. भुरटेलने 17 बॉलमध्ये 29 रन करून नेपाळला जलद सुरूवात करून दिली.
advertisement
4/6
नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने 34 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 39 रन केले. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या पौडेलने दीपेंद्र सिंग ऐरेच्या मदतीने नेपाळची पडझड रोखली.
advertisement
5/6
दीपेंद्र सिंग ऐरेने 29 बॉलमध्ये 44 रन केले, ज्यात 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. याशिवाय दीपेंद्रने बॉलिंगमध्येही चमक दाखवली, त्याने 3 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या.
advertisement
6/6
इंग्लंडची टीम एकवेळ 200 रनच्या पुढे जाईल असं वाटत होतं, पण नंदन यादवने इंग्लंडला 184 वर रोखलं. नंदनने 3 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वानखेडेवर जगाला दाखवून दिलं, इंग्लंडची धडधड वाढवणारे नेपाळचे 5 'बहादूर'!