हातात बॅट अन् साडीचा पदर खोचला, अनोख्या क्रिकेट स्पर्धेत शेतकरी महिलांचा धुमाकूळ, पाहा PHOTO
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: पेंडी कप हा उपक्रम केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून, मे ते डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या भातशेती प्रशिक्षणाचा तो एक भाग आहे.
advertisement
1/9

नेहमी शेतात राबणाऱ्या आणि घरकामात गुंतलेल्या ग्रामीण महिलांनी जेव्हा क्रिकेटची बॅट हातात घेतली, तेव्हा पुण्याच्या भोर आणि राजगड (वेल्हे) तालुक्यांतील चित्रच बदलून गेले. शेती हंगामाच्या समारोपानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायबेजआशा पॅडी कप अंतर्गत शेतकरी क्रिकेट स्पर्धेने केवळ क्रीडास्पर्धेचा उत्साह निर्माण केला नाही, तर ग्रामीण महिलांच्या नेतृत्वगुणांना आणि आत्मविश्वासालाही नवे व्यासपीठ मिळवून दिले.
advertisement
2/9
सायबेजआशा (सायबेज फाउंडेशन) यांच्या पुढाकाराने आयोजित या अनोख्या क्रिकेट स्पर्धेत यंदा महिलांचे तब्बल 40 संघ सहभागी झाले, तर पुरुषांचे 35 संघ मैदानात उतरले. विशेष म्हणजे, अनेक महिलांसाठी ही पहिलीच शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा होती.
advertisement
3/9
पारंपरिक चौकटींना छेद देत महिलांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्वाच्या भूमिकेत आत्मविश्वासाने सहभाग घेतला. मैदानाच्या कडेला उभे राहून कुटुंबीयांनी, विशेषतः पुरुषांनी, आपल्या लेकी-सुनांना दिलेले प्रोत्साहन हे ग्रामीण बदलाचे सकारात्मक चित्र दाखवणारे ठरले.
advertisement
4/9
पेंडी कप हा उपक्रम केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून, मे ते डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या भातशेती प्रशिक्षणाचा तो एक भाग आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या, शास्त्रीय आणि शाश्वत भातशेती पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते.
advertisement
5/9
दहा शेतकऱ्यांच्या गटांमध्ये काम करताना परस्पर सहकार्य, सामूहिक जबाबदारी आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित केली जाते.
advertisement
6/9
शेती हंगामात सायबेजआशाचे कृषी तज्ज्ञ प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन करतात. खर्च व मजुरी कमी करणे, उत्पादन वाढवणे, उत्पन्नात सुधारणा करणे तसेच सेंद्रिय आणि आधुनिक पद्धतींचा वापर यावर भर दिला जातो.
advertisement
7/9
या उपक्रमातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महिला शेतकऱ्यांचे नेतृत्व. क्रिकेट स्पर्धेत संघांचे नेतृत्व स्वीकारताना महिलांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
advertisement
8/9
सायबेज फाउंडेशनच्या प्रमुख रितू नथानी यांनी सांगितले की, सायबेजआशा पॅडी कप हा केवळ गुण किंवा ट्रॉफीपुरता मर्यादित उपक्रम नाही. लोक एकत्र येऊन शिकतात, खेळतात आणि आनंद साजरा करतात.
advertisement
9/9
2025-26 च्या सायबेजआशा पॅडी कपमध्ये 4500 हून अधिक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. पारदर्शक गुणांकन पद्धती आणि आर्थिक प्रोत्साहनामुळे शाश्वत शेती सुधारणा आणि ग्रामीण एकात्मतेला बळ मिळत असून, भोर-राजगडमधील ही क्रिकेट स्पर्धा आज ग्रामीण विकासाचा उत्सव ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
हातात बॅट अन् साडीचा पदर खोचला, अनोख्या क्रिकेट स्पर्धेत शेतकरी महिलांचा धुमाकूळ, पाहा PHOTO