Team India : वर्ल्ड कप जिंकूनही हरमनप्रीतसोबत 'धोका', टीम इंडियाला मिळणार नाही ओरिजिनल ट्रॉफी!
- Published by:Shreyas Deshpande
 
Last Updated:
हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात जल्लोष केला गेला. फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 रननी पराभव केला.
advertisement
1/8

 विजयानंतर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला वर्ल्ड कपची चकचकीत ट्रॉफी दिली, यानंतर हरमनप्रीत आणि तिच्या टीमने ट्रॉफी घेऊन जोरदार सेलिब्रेशन केलं.
advertisement
2/8
 टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या या ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन केलं असलं तरी ही ट्रॉफी त्यांना मिळणार नाही. आयसीसीला ही ट्रॉफी परत द्यावी लागणार आहे. आयसीसी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला ओरिजिनल ट्रॉफी देत नाही. याऐवजी टीमला रेप्लिका ट्रॉफी म्हणजेच डमी ट्रॉफी दिली जाते.
advertisement
3/8
 मॅचनंतर फोटो शूट आणि अवॉर्ड सेरेमनीसाठी टीमला ओरिजिनल ट्रॉफी दिली जाते. पण फोटो सेशननंतर टीमकडून ही ट्रॉफी परत घेतली जाते. आयसीसीच्या नियमांमुळे विजेत्या टीमला ओरिजिनल ट्रॉफी दिली जात नाही.
advertisement
4/8
 टीमला फोटो सेशन किंवा व्हिक्ट्री परेड करण्यासाठी ओरिजिनल ट्रॉफी दिली जाते, पण त्यानंतर ही ट्रॉफी आयसीसीला परत द्यावी लागते. भारतीय टीमलाही असंच करावं लागणार आहे.
advertisement
5/8
 आयसीसी टीम इंडियाला डमी ट्रॉफी देईल जी हुबेहुब ओरिजिनल वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसारखीच असेल. ओरिजिनल ट्रॉफी प्रमाणे डमी ट्रॉफीवरही सोनं आणि चांदी असेल. तर ओरिजिनल ट्रॉफी दुबईमधल्या आयसीसी हेडक्वार्टरमध्ये ठेवली जाईल. ओरिजिनल ट्रॉफी चोरी होण्यापासून रोखण्यासाठी आयसीसी वर्ल्ड कपची ओरिजिनल ट्रॉफी स्वत:कडे ठेवते.
advertisement
6/8
 महिला वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं वजन जवळपास 11 किलो आहे. तसंच ट्रॉफीची उंची 60 सेंटीमीटर आहे. ट्रॉफीवर सोनं आणि चांदी लावण्यात आली आहे. ट्रॉफीवर स्टंप आणि बेल्सच्या आकाराचे तीन कॉलम चांदीचे आहे. तसंच वर असलेला ग्लोब सोन्याचा आहे.
advertisement
7/8
 वनडे वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर विजेत्या टीमचं नावही टाकलं जातं, आता यात टीम इंडियाचाही समावेश होणार आहे. भारतीय महिला टीम 47 वर्ष वर्ल्ड कप खेळत आहे, पण त्यांना पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकता आला आहे.
advertisement
8/8
 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय टीमवर पैशांचा पाऊस पडला आहे. टीम इंडियाला आयसीसीकडून जवळपास 40 कोटी रुपये प्राईज मनी देण्यात आलं आहे. तर बीसीसीआयने खेळाडूंना 51 कोटी रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. याशिवाय वेगवेगळी राज्यही खेळाडूंना कोट्यवधी रुपयांनी सन्मानित करणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : वर्ल्ड कप जिंकूनही हरमनप्रीतसोबत 'धोका', टीम इंडियाला मिळणार नाही ओरिजिनल ट्रॉफी!