Team India : अंडर-19 मध्ये धमाका, पण इंटरनॅशनलमध्ये सपशेल फेल, 5 दिग्गज रातोरात गायब झाले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाने सहाव्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. विराट, रोहित यांच्यासारख्या अनेक स्टार क्रिकेटपटूंनी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. पण असेही काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांना अंडर-19 वर्ल्ड कप गाजवूनही नंतर अपयश आले.
advertisement
1/6

अंडर-19 वर्ल्ड कप हा भारताच्या सीनियर टीममध्ये प्रवेशाचा दरवाजा आहे. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या खेळाडूंनी अंडर-19 क्रिकेटनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही धमाका केला, पण असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली, पण यानंतर ते अचानक गायब झाले.
advertisement
2/6
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारताने 2012 चा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला. उन्मुक्त चंदने स्पर्धेतील 6 सामन्यांमध्ये 49.20 च्या सरासरीने 246 रन केल्या. फायनलमध्ये चंदने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 रनची मॅच विनिंग खेळी केली, पण त्याला सीनियर टीममध्ये स्थान मिळवता आले नाही. 2021 मध्ये चंद भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि अमेरिकेकडून क्रिकेट खेळायला लागला.
advertisement
3/6
2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पृथ्वी शॉची लगेचच टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली, पण तेवढ्याच वेगाने शॉ टीममधून बाहेरही गेला. अंडर-19 वर्ल्ड कपच्या 6 सामन्यांमध्ये पृथ्वीने 65 पेक्षा जास्तच्या सरासरीने 261 रन केल्या, ज्यात 2 अर्धशतकही होती.
advertisement
4/6
विराट कोहलीने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला त्याच टीममध्ये तन्मय श्रीवास्तवही होता. यानंतर तन्मय उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला, पण त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. 2020 साली वयाच्या 30व्या वर्षी तन्मयने निवृत्ती घेतली.
advertisement
5/6
विजय झोल हा 2012 आणि 2014 मध्ये दोन अंडर-19 वर्ल्ड कप खेळला, पण त्यालाही कधीच टीम इंडियात संधी मिळाली नाही. विजय झोल हा आता क्रिकेटपासून दूर आहे.
advertisement
6/6
रवनीत रिकी हा 2000 साली श्रीलंकेत झालेल्या पहिल्या अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा भाग होता. स्पर्धेतील आठ सामन्यांमध्ये, रवनीतने ४२.५० च्या सरासरीने ३४० धावा केल्या, ज्याचा सर्वोच्च धावसंख्या १०८ होती. त्याने स्पर्धेत दोन अर्धशतके देखील केली. रिकीने देशांतर्गत क्रिकेट खेळणे सुरू ठेवले, कैफला टीम इंडियामध्ये बोलावण्यात आले, परंतु रवनीतला संधी मिळाली नाही. तो २००८ पर्यंत क्रिकेट खेळला, नंतर निवृत्त झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : अंडर-19 मध्ये धमाका, पण इंटरनॅशनलमध्ये सपशेल फेल, 5 दिग्गज रातोरात गायब झाले!