Vaibhav Suryavanshi : डबल सेंच्यूरी हुकली तरी वैभवने इतिहास रचला,वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन मोठे रेकॉर्ड मोडले
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये इतिहास रचला आहे.इंग्लंड विरूद्ध सूरू असलेल्या वर्ल्डकप फायनल सामन्यात वैभव सूर्यवंशीची डबल सेच्यूरी हुकली असली तकी त्याने त्याने दोन मोठे रेकॉर्ड केले आहेत.
advertisement
1/8

2/8
वैभव सूर्यवंशीने पहिल्यांदा 55 बॉलमध्ये शतक ठोकलं होत. या शतकानंतर त्याने ताबडतोड फलंदाजी करून 80 बॉलमध्ये 175 धावांची दीड शतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले होते.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 218 होता.
advertisement
3/8
विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी या सामन्यात डबल सेंच्यूरी ठोकू शकला असता. पण त्याची ही डबल सेंच्यरी हुकली तरी त्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हे रेकॉर्ड नेमके काय आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/8
वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वर्ल्डकपच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.वैभवने 14.1 व्या षटकात स्पिनर फरहान अहमदला लाँग-ऑफवर बाद करून डेवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रम मोडला.
advertisement
5/8
बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने 2022च्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये सहा सामन्यांमध्ये 20 षटकार मारले होते.वैभवने 23 षटकार मारून त्याचा विक्रम मोडला.
advertisement
6/8
वैभव सूर्यवंशीने 2008 च्या वर्ल्डकपचा भाग असलेल्या तन्मय श्रीवास्तवला मागे टाकले.त्यामुळे वैभव आता युथ वनडे सामन्यांमध्ये भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
advertisement
7/8
फायनलपूर्वी वैभव सूर्यवंशीला 80 धावांची आवश्यकता होती. हा विक्रम ओलांडून, त्याने युथ वनडे सामन्यांमध्ये भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी तन्मय श्रीवास्तवला मागे टाकले.
advertisement
8/8
विशेष म्हणजे या स्पर्धेत विराट कोहली, सरफराज खान, शुभमन गिल आणि उन्मुक्त चंद सारख्या स्टार खेळाडूंना आधीच मागे टाकले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : डबल सेंच्यूरी हुकली तरी वैभवने इतिहास रचला,वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन मोठे रेकॉर्ड मोडले