TRENDING:

Hasin Jahan Mohammed Shami Life : मोहम्मद शमीच्या पत्नी हसीन जहाँचा मुलीसोबत नवीन व्हिडिओ, म्हणाली 'मला पाहून...'

Last Updated:
Hasin Jahan Mohammed Shami Life : आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद शमीची कामगिरी पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.
advertisement
1/5
मोहम्मद शमीच्या पत्नी हसीन जहाँचा मुलीसोबत नवीन व्हिडिओ, म्हणाली 'मला पाहून...'
मोहम्मद शमीच्या वर्ल्ड कप 2023 (<a href="https://news18marathi.com/sport/ind-vs-aus-final-live-score-updates-icc-odi-cricket-world-cup-2023-narendra-modi-stadium-ahmedabad-marathi-news-mhda-1081148.html">World Cup Final 2023</a>) मधील चमकदार कामगिरीमुळे लोकांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही रस दाखवायला सुरुवात केली आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची पत्नी आणि अभिनेत्री हसीन जहाँ, जिच्याशी त्याचे अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. तिने कौटुंबिक हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप करून मोहम्मद शमीवर कायदेशीर कारवाई केली होती. मात्र, तिच्या ताज्या व्हिडीओवरुन जेव्हा नेटिझन्सना वाटले की ती मोहम्मद शमीला काहीतरी सांकेतिक म्हणायचं आहे. तेव्हा त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य: Instagram@mdshami.11@hasinjahanofficial)
advertisement
2/5
व्हिडिओमध्ये लता मंगेशकर यांच्या 'मुझे देखा जरा मुस्कुरा दो' गाण्यावर लिप सिंक करताना हसीन जहाँने आपली अदा दाखवली आहे. यानंतर मोहम्मद शमीचे चाहते तिच्यावर तुटून पडले. एक युजर म्हणला, 'अहो शमी भाई विरघळणार नाही, तो तुझ्यावर रागावला आहे. मला माहित आहे की शमीभाई हे गाणे गाऊन तुमचा आनंद साजरा करत असत, पण आता तसं नाही. दुसऱ्या युजरने लिहलंय, की 'आता आयुष्यभर हसत राहा. त्याच्याशी खोटं बोलून तू लग्न केलंस. (फोटो सौजन्य: Instagram@hasinjahanofficial)
advertisement
3/5
खूप ट्रोल झाल्यानंतर हसीन जहाँने तिच्या मुलीसोबतचा व्हिडीओ शेअर केला तेव्हा लोक म्हणाले, 'तुम्ही शमी भाईसोबत चांगले केलं नाही.' अनेक लोक कमेंट करत असून अभिनेत्रीला फ्रॉड म्हणत आहेत. शमीला फसवल्यानंतर आता तू कोणावर प्रेम करतेस?' (फोटो सौजन्य: Instagram@hasinjahanofficial)
advertisement
4/5
वर्ल्ड कपनंतर पायल घोष आमची वहिनी होईल, अशी प्रतिक्रिया क्रिकेटरच्या एका चाहत्याने दिली. खरंतर, न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद शमीच्या शानदार कामगिरीने प्रभावित झालेली अभिनेत्री पायल घोषने त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जेव्हा हसीन जहाँला एका मुलाखतीत पायल घोषच्या लग्नाच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा तिने एवढेच सांगितले की, सेलिब्रिटींना लग्नाचे प्रस्ताव येणे खूप सामान्य गोष्ट आहे. (फोटो सौजन्य: Instagram@hasinjahanofficial)
advertisement
5/5
हसीन जहाँने मुलाखतीत असेही म्हटले होते की, जसा तो एक चांगला खेळाडू आहे, जर माणूसही चांगला असता तर आपले आयुष्य चांगले असते. मुलगी, नवरा आणि मी चांगलं आयुष्य जगलो असतो. तो एक चांगला खेळाडूच नाही तर एक चांगला नवरा आणि वडीलही असता तर खूप अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट होती, पण शमीच्या चुका, लोभ आणि घाणेरडे मन यामुळे आम्हा तिघांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील. मात्र, पैशाच्या जोरावर ते आपली नकारात्मकता लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. (फोटो सौजन्य: Instagram@mdshami.11)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Hasin Jahan Mohammed Shami Life : मोहम्मद शमीच्या पत्नी हसीन जहाँचा मुलीसोबत नवीन व्हिडिओ, म्हणाली 'मला पाहून...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल