10 दिवसांत 1200 कोटींची कमाई! Dhurandhar 2 इतका हिट कसा झाला? फिल्ममधील अभिनेत्यानेच उलगडलं 'सीक्रेट'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 : धुरंधर 2 ही फिल्म एकीकडे कमाईचे नवीन टप्पे गाठत आहे, तर दुसरीकडे इंटरनेटवरही धुमाकूळ घालत आहे. ही फिल्म इतकी हिट होण्याचं नेमकं रहस्य काय आहे? हे फिल्मच्या अभिनेत्यानेच सांगितलं आहे.
advertisement
1/7

धुरंधर 2 किंवा धुरंधर : द रिव्हेंज' फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर सोशल मीडियावरही वर्चस्व गाजवत आहे. या फिल्मने कित्येक रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 10 दिवसांत तब्बल 1200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. धुरंधर 2 इतकी हिट कशी काय झाली? याच्या यशाचं सीक्रेट या फिल्मच्या अभिनेत्यानेच उलगडलं आहे.
advertisement
2/7
अभिनेता म्हणाला, "ही फिल्म म्हणजे बदलत्या सिनेमाचं एक उदाहरण आहे. प्रेक्षक आता पूर्वीपेक्षा अधिक पारखी झाले आहेत. ते फक्त बिग बजेट किंवा स्टार पॉवरने प्रभावित होत नाहीत. त्यांना स्ट्राँग स्टोरी आणि रिअल अशा फिल्म अधिक आवडतात. यालाच ते प्राधान्य देत आहेत. आज फिल्मचं यश स्टार पॉवरने नाही तर त्याच्या गुणवत्तेने ठरवलं जातं"
advertisement
3/7
"आजचे प्रेक्षक फक्त मनोरंजनासाठी चित्रपट पाहत नाहीत, तर त्यातील मूळ मेसेज आणि क्वालिटीही समजून घेतात. म्हणूनच चित्रपटाच्या यशासाठी स्ट्राँग कंटेन्ट खूप महत्त्वाचा ठरला आहे. मोठी नावं किंवा बिग बजेट आता यशाची हमी देत नाहीत", असं त्याने सांगितलं.
advertisement
4/7
आज फिल्म फक्त स्थानिक प्रेक्षकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर त्याला जागतिक स्तरावरही लोकप्रियता मिळत आहे. आजच्या डिजिटल युगात फिल्मचं यश फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून मोजलं जात नाही. सोशल मीडियावर त्याची उपस्थितीही तितकीच महत्त्वाची आहे. मीम्स, ट्रेंड्स आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून आता एखादा चित्रपट लोकांना भावतो की नाही हे ठरतं, असं तो म्हणाला.
advertisement
5/7
धुरंधर 2 चित्रपटाचे संवाद, पात्रं आणि अनेक प्रभावी सीन्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. लोक मीम्सच्या माध्यमातून आपापल्या पद्धतीने चित्रपटाचं रिक्रिएशन करत आहेत, ज्यामुळे फिल्मची लोकप्रियता आणखी वाढत आहे, असं अभिनेत्याने सांगितलं.
advertisement
6/7
या फिल्ममध्ये भूमिका साकारणारा अभिनेता मानव गोहिलने सुशांत बन्सलने फिल्मच्या यशाची ही रहस्य सांगितली आहे. ज्याने इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे आयबीचा उपसंचालक सुशांत बन्सलचं पात्र साकारलं आहे.
advertisement
7/7
चित्रपट निर्मितीमध्ये आता कोणताही शॉर्टकट उरलेला नाही. प्रेक्षकांना प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी कथा पाहायच्या आहेत. भविष्यातही असेच आशय प्रधान चित्रपट बनत राहतील, ज्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि अर्थपूर्ण अनुभवण्याची संधी मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
10 दिवसांत 1200 कोटींची कमाई! Dhurandhar 2 इतका हिट कसा झाला? फिल्ममधील अभिनेत्यानेच उलगडलं 'सीक्रेट'