TRENDING:

चाहत पांडेसोबत अफेअरच्या चर्चा, Bigg Boss फेम रजत दलालने गुपचूप गंगाकिनारी बांधली लग्नगाठ, कोण आहे त्याची बायको?

Last Updated:
Bigg Boss fame Rajat Dalal secret wedding: गेल्या अनेक दिवसांपासून "मी कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे" असं सांगणारा रजत नक्की कोणाच्या प्रेमात पडलाय, हे गुपित त्याने शेवटपर्यंत जपलं. अशातच आज अचानक लग्नाचे फोटो शेअर करून त्याने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
1/9
Bigg Boss फेम रजत दलालने गुपचूप गंगाकिनारी बांधली लग्नगाठ, कोण आहे त्याची बायको?
'बिग बॉस' आणि 'द ५०' यांसारख्या लोकप्रिय शोमधून देशातील घराघरात पोहोचलेला फिटनेस इन्फ्लूएन्सर रजत दलालने आज रविवार २९ मार्च रोजी सर्वांना एक आनंदाचा धक्का दिला आहे.
advertisement
2/9
प्रत्येक शोमध्ये रजतने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीचा वारंवार अप्रत्यक्ष उल्लेख केला होता. मात्र, त्याची स्वप्नसुंदरी नक्की कोण आहे, हे कधीही प्रेक्षकांसमोर आलं नव्हतं. अखेर स्वतः रजतने या रहस्यावरून पडदा पाडला असून त्याने आपल्या लग्नाचे फोटो सर्वांसमोर आणले आहेत.
advertisement
3/9
गेल्या अनेक दिवसांपासून "मी कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे" असं सांगणारा रजत नक्की कोणाच्या प्रेमात पडलाय, हे गुपित त्याने शेवटपर्यंत जपलं. अशातच आज अचानक लग्नाचे फोटो शेअर करून त्याने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
4/9
विशेष म्हणजे रजतने आपल्या लग्नासाठी उत्तराखंडमधील ऋषिकेशची पवित्र भूमी निवडली. देशात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा किनारी त्याने आपल्या पत्नीसह सात फेरे घेतले आहेत. यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
advertisement
5/9
रजतने मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आपल्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नातील फोटो शेअर करताना रजतने लिहिलं, "जीवनाच्या एका नव्या पैलूची सुरुवात!"
advertisement
6/9
लग्नाच्या वेळी रजत पांढऱ्या रंगाच्या शेरवाणीमध्ये अतिशय देखणा दिसत होता, तर त्याच्या पत्नीने पारंपरिक लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. 'द फिफ्टी' शोमध्ये त्याने लवकरच लग्न करण्याचे संकेत दिले होते, पण इतक्या लवकर तो बोहल्यावर चढेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.
advertisement
7/9
दरम्यान, रजतने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर, त्याची पत्नी नक्की कोण आहे? याबाबत विचारणा केली जात आहे. मात्र, रजतने आपल्या पत्नीची ओळख अतिशय गुप्त ठेवली असून त्याने तिला लग्नाच्या पोस्टमध्येही टॅग केलेले नाही. त्यामुळे रजतच्या पत्नीबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
advertisement
8/9
रजतच्या लग्नाची पोस्ट समोर आल्यापासून त्यावर शुभेच्छांचा पूर आला आहे. 'बिग बॉस' आणि 'द ५०' या शोमधील रजतचे सहस्पर्धक शिव ठाकरे, मिस्टर फैसू, कशिश कपूर आणि उर्वशी ढोलकिया इत्यादींनी रजतवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
advertisement
9/9
रजत दलालचं नाव वादांशी नवीन नाही. कॅरी मिनाटीसोबतचा वाद असो वा सोशल मीडियावरील त्याचे आक्रमक व्हिडिओ, रजत नेहमीच चर्चेत राहिला. 'बिग बॉस १८' मध्ये गेल्यावर मात्र त्याने आपली एक वेगळी आणि भावनिक बाजू प्रेक्षकांसमोर ठेवली होती.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
चाहत पांडेसोबत अफेअरच्या चर्चा, Bigg Boss फेम रजत दलालने गुपचूप गंगाकिनारी बांधली लग्नगाठ, कोण आहे त्याची बायको?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल