Apurva Nemlekar : अजूनही त्याची दहशत! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, व्यक्त केली भीती; कशाला घाबरतेय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Apurva Nemlekar : आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी आणि 'रात्रीस खेळ चाले'मध्ये सगळ्यांना घाबरवणारीही सगळ्यांची लाडकी शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर एक भीती व्यक्त केली आहे.
advertisement
1/7

रात्रीस खेळ चालेची शेवंता जिने आपल्या सौंदर्याने मालिकेतील अण्णा नाईक या पात्रालाच नव्हे तर कित्येक प्रेक्षकांनाही आकर्षिक केलं. नंतर हीच शेवंता भीतीदायक बनली. शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर जिला आजही एका गोष्टीची भीती वाटते.
advertisement
2/7
अपूर्वी नेमळकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते तिच्या दुसऱ्या लग्नामुळे. पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोटानंतर तिने 14 फेब्रुवारी 2026 रोजी व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. ती तिचा नवरा तनुज गोवाळकरसोबतचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
advertisement
3/7
नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यात तिने भीती व्यक्त केली आहे. अजूनही त्याची दहशत आहे, असं ती म्हणाली आहे. अपूर्वाची नेमकी भीती काय, ती कशाला घाबरते हेसुद्धा तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
advertisement
4/7
अपूर्वा नेमळेकरने या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. जो घुबडाचा फोटो आहे. ज्यात घुबडाचे डोळे दिसत आहेत. जे खूप भीतीदायक वाटत आहेत. या पोस्टमध्ये खाली म्हटलं आहे, "एकच नजर बस्सं होती. त्याची दहशत अजूनही आहे"
advertisement
5/7
याच फोटोच्या वर तुम्ही पाहाल तर तिथं म्हटलं आहे, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमच्या मुलांना कंट्रोल नाही करू शकत. माझी आई मला अशा पद्धतीने कंट्रोल करते.
advertisement
6/7
एकंदर काय तर अपूर्वाची ही भयानक वाटणारी पोस्ट खरंतर मजेशीर आहे. अपूर्वाची ही भीती खरंतर तिची एकटीची नाही तर कित्येकांची आहे.
advertisement
7/7
आईची रागात ती एक अशी नजर ज्याला अजूनही कित्येक जण घाबरत असतील, अपूर्वाने त्याला उपहासात्मक म्हणून हा असा घुबडाच्या डोळ्यांचा फोटो लावला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Apurva Nemlekar : अजूनही त्याची दहशत! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, व्यक्त केली भीती; कशाला घाबरतेय?