TRENDING:

'नाहीतर आज मी चुकीच्या घरात असते', बॉयफ्रेंडसोबत Bigg Boss मध्ये गेली, ब्रेकअपच्या 2 वर्षांनी अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Last Updated:
रुचिता जाधवने नुकतंच एका मुलाखतीत तिचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. या शोमध्ये रुचिताने तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदेसोबत एन्ट्री घेतली होती. मात्र, शोनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.
advertisement
1/8
बॉयफ्रेंडसोबत Bigg Boss मध्ये गेली, ब्रेकअपच्या 2 वर्षांनी अभिनेत्रीचा मोठा खुलासा
बिग बॉस या शोने अनेक कलाकारांना ओळख दिली आहे. भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये लोकप्रिय ठरलेला हा शो मराठीमध्येही तुफान गाजतोय. या शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
advertisement
2/8
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून शोमध्ये आलेल्या रुचिताने नुकतंच एका मुलाखतीत तिचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. या शोमध्ये रुचिताने तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदेसोबत एन्ट्री घेतली होती. मात्र, शोनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.
advertisement
3/8
रुचिता आणि रोहितच्या ब्रेकअपला आता तीन वर्षे झाली आहेत. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत रुचिराने तिच्या ब्रेकअपबद्दल अखेर मौन सोडलं आहे. त्यांच्या ब्रेकअपचं कारण ऐकून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
advertisement
4/8
रुचिराने तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला. ती म्हणाली, गेली दोन वर्ष मी एका वेगळ्याच मानसिक विवंचनेत होती. बिग बॉसमध्ये ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यातील काही गोष्टी बाहेर आल्या, ते पाहून मला खूप वाईट वाटलं. मला सतत असं वाटायचं की माझं खूप मोठं नुकसान झालं आहे. पण गेल्या वर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाला साकडं घातलं की सगळं नीट कर.
advertisement
5/8
या काळात रुचिरा आणि तिच्या आईवडिलांच्या नात्यातही मोठी उलथापालथ झाली. तिच्या आईवडिलांच्या नजरेत तीच चुकीची होती. मात्र, तिला ज्या गोष्टी माहीत होत्या, त्या तिच्या आईवडिलांना माहीत नव्हत्या. यामुळे त्यांच्यात अंतर निर्माण झालं होतं.
advertisement
6/8
तथापि, विठ्ठलाच्या दर्शनानंतर दोन-तीन दिवसांमध्येच अशा काही गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे रुचिराच्या आईवडिलांचे डोळे उघडले आणि अखेर त्यांना सत्य समजलं. त्यानंतर रुचिरा आणि तिच्या पालकांमधील नातं पुन्हा पूर्वीसारखं झालं.
advertisement
7/8
रुचिरा आणि रोहित गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून बिग बॉसच्या घरात गेले असले, तरीही या घरातच त्यांच्या ब्रेकअपचे वारे वाहू लागले होते. या आठवणींना उजाळा देत रुचिरा म्हणाली, "जर त्यावेळी मी बिग बॉसच्या घरात गेले नसते, तर आज मी चुकीच्या घरात असते. पण आज मी सुदैवाने माझ्या स्वतःच्या घरात सुरक्षित आहे. या सगळ्याचं श्रेय मी बिग बॉसला देईन, कारण तिथे गेल्यामुळेच मला समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा वेळीच समजला."
advertisement
8/8
रुचिराने 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील 'माया' या भूमिकेतून मालिका विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ती स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत खलनायिकेच्या पात्रात दिसत आहे.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'नाहीतर आज मी चुकीच्या घरात असते', बॉयफ्रेंडसोबत Bigg Boss मध्ये गेली, ब्रेकअपच्या 2 वर्षांनी अभिनेत्रीचा मोठा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल