IPL 2026 : 6 बॉलर 5 बॅट्समन... पहिल्याच मॅचमध्ये हार्दिकने हे काय केलं? मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स त्यांच्या मोहिमेची सुरूवात करत आहे. मुंबईचा मोसमातला पहिलाच सामना केकेआरविरुद्ध होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही हाय व्होल्टेज लढत होत आहे.
advertisement
1/8

आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 पर्यंत पोहोचली होती, पण त्या सामन्यात पंजाबविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला, तर दुसरीकडे केकेआरची कामगिरी निराशाजनक झाली.
advertisement
2/8
आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधीच केकेआरला धक्कामागे धक्के लागले. हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून बाहेर झाला, तर मुस्तफिजूर रहमानलाही माघार घ्यावी लागली. दुखापतीमुळे मथिशा पथिराणाही अजून केकेआरच्या टीममध्ये दाखल झालेला नाही.
advertisement
3/8
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचे विल जॅक्स आणि मिचेल सॅन्टनर हे दोन्ही खेळाडू पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. या दोघांनाही दुखापत झाली आहे? का वैयक्तिक कारणासाठी दोघं उपलब्ध नाहीत, याबाबत मात्र अजूनही सस्पेन्स आहे.
advertisement
4/8
मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात आयपीएल इतिहासात 35 मॅच झाल्या आहेत, यातल्या 24 सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला तर फक्त 11 सामन्यांमध्ये केकेआरला जिंकता आलं आहे. वानखेडे स्टेडियमवर या दोन्ही टीममध्ये 12 मॅच झाल्या आहेत, यातले 10 सामने मुंबईने आणि 2 सामने केकेआरने जिंकले.
advertisement
5/8
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आम्हीही टॉस जिंकूनही पहिले बॉलिंगचाच निर्णय घेतला असता, असं केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला आहे.
advertisement
6/8
आम्ही बॉलिंग करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसते आहे, आधीपेक्षा थोडी हिरवी वाटते. खेळ कसा होतो ते पाहू. हा आमचं गड आहे, प्रेक्षक आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही चांगला खेळ करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही काही आठवडे आधीच तयारी सुरू केली आहे, आमच्याकडे अनुभवही आहे आणि तरुण खेळाडूही आहेत. रोहित, सूर्य, मिचेल सँटनर - त्यामुळे कर्णधारांची कमतरता नाही; मी फक्त मैदानात उतरून चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही 6 बॅट्समन आणि 5 बॉलरसह खेळत आहोत.
advertisement
7/8
मुंबईची प्लेइंग इलेव्हन : मुंबईची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, रियान रिकलटन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शरफेन रदरफोर्ड, नमन धीर, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, अल्लाह गझनफर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह
advertisement
8/8
केकेआरची प्लेइंग इलेव्हन : फिन ऍलन, अजिंक्य रहाणे, कॅमरून ग्रीन, अंगरीक्ष रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकूल रॉय, सुनिल नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 6 बॉलर 5 बॅट्समन... पहिल्याच मॅचमध्ये हार्दिकने हे काय केलं? मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण