फोनवर कव्हर का लावू नये? वर्षानुवर्षे वापरणाऱ्यांनाही माहिती नाहीत तोटे, काढून फेका मगच कळेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Phone cover harm: 90% लोक फोनवर कव्हर लावतात. पण खूप कमी लोकांना याच्या नुकसानाविषयी माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया मोबाईलवर कव्हर का लावू नये.
advertisement
1/7

नवा फोन खरेदी केल्यावर प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेतो. आपल्या नव्या कोऱ्या फोनच्या स्क्रीनवर थोडाही स्क्रॅच टाळण्यासाठी, लोक लगेच स्क्रीन गार्ड लावतात. तसंच फोनसाठी कव्हर ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते. लोक आपल्या आवडीच्या रंगाचा फोन खरेदी करतात. पण त्यावरही कव्हर लावतात. जेणेकरुन फोन सुरक्षित राहावा.
advertisement
2/7
पण खूप कमी लोकांना माहित असेल की फोन कव्हर देखील मोबाईलसाठी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करु शकते. होय, फोनचं कव्हर हे प्रत्येकवेळी फायदेशीर ठरत नाही. ते कसं पाहूया.
advertisement
3/7
फोनवर कव्हर लावल्याने यामध्ये हीटिंगची समस्या निर्माण होऊ शकते. विशेषत: उन्हाळ्यात फोनवर कव्हर लावून ठेवले तर हे मोबाईल लवकर गरम होतात. फोन गरम झाल्यामुळे ते हँग होतात आणि स्लो चालू लागतात.
advertisement
4/7
काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की, फोनवरील कव्हरमुळे त्याच्या चार्जिंगमध्ये प्रॉब्लम येतात. असं म्हटलं जातं की, फोन गरम होतो तेव्हा तो नीट चार्ज होऊ शकत नाही.
advertisement
5/7
तुम्ही चांगल्या क्वालिटीचा कव्हर लावला नाही तर बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो. याशिवाय तुमचे कव्हर मॅग्नेटिक असेल तर त्यामुळे जीपीएस आणि Compass ही समस्या निर्माण होतात.
advertisement
6/7
आजकाल मोबाइल कंपन्या गजब डिझाइन केलेले बॅक पॅनेल असलेले नवीन फोन लॉन्च करताय. अशा वेळी तुम्ही तुमच्या फोनवर कव्हर लावला तर त्याचा संपूर्ण लुक लपला जाईल.
advertisement
7/7
तुम्हाला फोनला स्क्रॅचपासून वाचवण्यासाठी कव्हर लावायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट करा. चार्जिंग करताना कव्हर काढून टाका. याशिवाय गेम खेळतानाही फोनवर कव्हर लावू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
फोनवर कव्हर का लावू नये? वर्षानुवर्षे वापरणाऱ्यांनाही माहिती नाहीत तोटे, काढून फेका मगच कळेल