TRENDING:

Amazon-Flipkart वर एवढ्या स्वस्तात सामान कसं मिळतं? सत्य जाणून व्हाल चकीत

Last Updated:
Amazon Flipkart Sale: अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तुम्हाला अनेक प्रोडक्ट्स मोठ्या डिस्काउंटमध्ये मिळतात. बऱ्याचदा प्रश्न पडतो की ऑफलाइन मार्केटच्या तुलनेत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वस्तू स्वस्त कशा मिळतात.
advertisement
1/8
Amazon-Flipkart वर एवढ्या स्वस्तात सामान का कसं मिळतं? सत्य जाणून व्हाल चकीत
ऑनलाइन विक्रीमुळे लोकांची खरेदी करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी लोक कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी ऑफलाइन मार्केटमध्ये जायचे. आता पेमेंटपासून ते खरेदीपर्यंत सर्व काही ऑनलाइन होत आहे. जे लोक कोणत्याही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक पैलूची तपासणी करायचे, ते देखील ऑनलाइन खरेदी करत आहेत.
advertisement
2/8
याचे मोठे कारण म्हणजे ऑनलाइन मार्केट प्लेसवर मिळणारी सूट. आयफोनबद्दल बोलायचे झाले तर, फ्लिपकार्ट-अमेझॉनवर आयफोनवर भरभरुन सूट मिळत असते.
advertisement
3/8
प्रश्न असा आहे की, या कंपन्या प्रोडक्ट कुठून आणतात, जे ते कमी किमतीत विकू शकते. कमी किमतीत उत्पादन विकून ते नफा कसा कमवतात. या संपूर्ण प्रक्रियेची बिझनेस कॉन्सेप्ट काय आहे ते जाणून घेऊया.
advertisement
4/8
लहान व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊन : MSMEsना प्रोत्साहन देऊन, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट स्वस्त किमतीत अधिक वस्तू विकू शकतात. एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. त्यांच्यामुळेच ई-मार्केटप्लेसवर स्वस्त दरात उत्पादने उपलब्ध होतात.
advertisement
5/8
दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्थानिक व्यवसाय मालकांशी आणि इतर एमएसएमईशी स्वस्त दरात वस्तू विकण्यासाठी संपर्क साधतात. अलिकडेच, अमेझॉनने सांगितले होते की कोट्यवधी ग्राहक MSMEs आणि स्थानिक व्यवसायांच्या उत्पादनांना पसंती देत ​​आहेत.
advertisement
6/8
तुम्ही कोणत्याही कंपनीची वेबसाइट पाहिली तर तेथील प्रोडक्टची किंमत अमेझॉन-फ्लिपकार्टपेक्षा जास्त असते. मग प्रश्न उद्भवतो की या कंपन्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची उत्पादने स्वस्त दरात का विकतात? यामागील कारण नेमके काय?
advertisement
7/8
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, कमी नफा मिळवून अधिक वस्तू विकणे. म्हणजेच एकूण नफा हा जास्त होतो. ब्रँड त्यांचे मार्जिन कमी करून येथे अधिक उत्पादने विकू शकतात. दुसरे म्हणजे, त्यांना अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ग्राहकांचा एक मोठा गट मिळतो. अशा प्रत्येक उत्पादनावर ब्रँडचा नफा कमी असला तरी, विक्री वाढल्याने त्यांचा एकूण नफा वाढतो.
advertisement
8/8
प्रत्येक सेलमध्ये, कोणत्या ना कोणत्या बँकेच्या कार्डवर सूट उपलब्ध असल्याने. कंपन्यांनाही याचा फायदा मिळतो. प्रत्यक्षात, विक्रीत दाखवलेली किंमत ही सर्व डिस्काउंनंतरची असते. यामध्ये बँक ऑफर देखील समाविष्ट आहे. यामुळे कंपन्या त्यांच्या वस्तू स्वस्त दरात विकू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Amazon-Flipkart वर एवढ्या स्वस्तात सामान कसं मिळतं? सत्य जाणून व्हाल चकीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल