TRENDING:

Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 152 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी

Last Updated:
सध्याच्या काळात सर्वच टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती या वाढवल्या आहेत. दरम्यान जिओचा एक रिचार्ज प्लॅन अगदी स्वस्तात आपल्याला मिळू शकतो. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/5
Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 152 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी
मोबाईलवर फोन कॉल आणि इंटरनेट चालू ठेवायचे असतील तर रिचार्ज प्लॅन टाकणं आवश्यक असतं. स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन मिळवा असं प्रत्येकाला वाटत असते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी रिलायन्स जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केलाय. जो फक्त 152 रुपयांत उपलब्ध होईल.
advertisement
2/5
Jio ने नुकताच आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्याची किंमत फक्त 152 रुपये आहे. हा प्लान खास Jio फोन यूजर्ससाठी तयार करण्यात आला आहे. याची व्हॅलिडिटी आणि यात डेटा किती मिळेल पाहूया.
advertisement
3/5
या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. म्हणजे एक महिना तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.या प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करण्याची सुविधा मिळते. तुम्ही कोणत्या नेटवर्कवर कॉल केलात हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
advertisement
4/5
दररोज 500 MB हाय-स्पीड इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. हा डेटा बहुतांश जिओ फोन यूझर्सना त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.
advertisement
5/5
मनोरंजन पॅकेज: या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि इतर अनेक ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च न करता मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 152 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल