TRENDING:

अनेकांना माहिती नसेल, घातक आजारांवर उपचारासाठी होतो सापाच्या विषाचा वापर

Last Updated:
साप एक असा प्राणी आहे, ज्याला सर्वजण घाबरतात. भारतासह जगभरात दरवर्षी सर्पदंशाने सुमारे 1 लाख 25 हजार जणांचा मृत्यू होतो. मात्र, दरवर्षी लाखो लोकांचा जीव घेणारे तेच विष आता जीवरक्षक औषधांच्या निर्मितीमध्ये वापरले जात आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा स्पेशल रिपोर्ट. (आशिष कुमार, प्रतिनिधी, पश्चिम चम्पारण)
advertisement
1/5
अनेकांना माहिती नसेल, घातक आजारांवर उपचारासाठी होतो सापाच्या विषाचा वापर
मागील 22 वर्षांपासून वन्यजीवांवर काम करणारे तज्ज्ञ स्वप्नील खताळ यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सापाचे विष प्रोटीनपासून तयार होते. हीमो टॉक्सिन, न्यूरोटॉक्सिन, माया टॉक्सिन किंवा सायटोकाइन, या विषामध्ये आढळणारे प्रोटीन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारख्या अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. विशेष म्हणजे, केवळ सापच नाही तर विंचू, कोळी यांसारख्या इतर विषारी प्राण्यांच्या विषाचाही औषधी बनवण्यासाठी वापर केला जातो.
advertisement
2/5
रसेल व्हायपर या सापामध्ये उच्च दर्जाचे हेमोटॉक्सिक विष आढळते. शरीरात प्रवेश करताच त्याचा रक्तदाब आणि रक्त गोठण्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित नवीन औषधे विकसित करण्यासाठी या विषाचा वापर करत आहेत.
advertisement
3/5
आज बाजारात इतर प्राण्यांच्या विषाच्या तुलनेत सापाच्या विषापासून बनवलेली अनेक औषधे उपलब्ध आहेत. सापाच्या विषाचा उपयोग केवळ जीवरक्षक औषधांच्या निर्मितीमध्येच नाही तर असंख्य कॉस्मेटिक उत्पादने तयार करण्यासाठीही केला जात आहे.
advertisement
4/5
सध्या कर्करोग, ट्यूमर आणि ब्रेन हॅमरेज यांसारख्या जीवघेण्या आजारांवर उपचारासाठी सापाच्या विषाच्या वापरावर चाचण्या सुरू आहेत. तसेच जगातील सर्वात मौल्यवान कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये सापाच्या विषाचे घटक वापरले गेले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
5/5
सूचना - या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या बातमीतील मतांशी लोकल18 मराठी कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अनेकांना माहिती नसेल, घातक आजारांवर उपचारासाठी होतो सापाच्या विषाचा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल