Idli Dosa Batter : तुम्हीही एकाच पिठापासून बनवता इडली, डोसा; इथंच चुकताय! साऊथ इंडियनने सांगितले 4 फरक
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Make Idli Dosa Batter : एकाच पिठापासून इडली आणि डोसा एकाच पिठापासून बनवू नका, असा सल्ला साऊथ इंडियन महिलेने दिला आहे. डोसा आणि इडली पीठात भिजवण्यापासून ते वाटण्यापर्यंत फरक असल्याचं तिने सांगितलं आहे.
advertisement
1/5

घरात इडली, डोसा बनवायचं म्हटलं की कुणाला इडली आवडते, तर कुणाला डोसा. मग ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पदार्थ बनवला जातो, पण त्यासाठी एकच बॅटर वापरलं जातं. एक पीठ त्यापासून डोसा आणि इडली. तसं एकाच पिठापासून दोन्ही पदार्थ बनतात. पण तुम्ही पाहिलं असेल की तुमचे हे पदार्थ फसले असतील किंवा हवे तसे ते बनत नाहीत. याचं कारण म्हणजे पीठच आहे.
advertisement
2/5
इडली, डोशाचं पीठ सारखं वाटत असलं तरी या पिठात एक-दोन नाही तर चार फरक आहेत. एका साऊथ इंडियन महिलेने याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली आहे. पिठासाठी धान्य भिजवण्यापासून ते पीठ वाटण्यापर्यंत प्रत्येक प्रक्रियेत फरक आहे.
advertisement
3/5
सगळ्यात पहिलं म्हणजे इडलीच्या पिठासाठी धान्य 10-12 तास भिजवायला हवं. तर डोशाच्या पिठासाठी 4 तास पुरेसे आहेत.
advertisement
4/5
दुसरं म्हणजे इडलीचं पीठ वाटल्यानंतर किंचित दाणेदार हवं तर डोसा पीठ पूर्ण स्मूथ असायला हवं. तिसरं म्हणजे इडलीचं पीठ घट्ट असायला हवं, इडलीचं फॉर्मेशन होणार नाही तर डोसाचं पीठ पातळ हवं नाहीतर ते तव्यावर नीट पसरणार नाही.
advertisement
5/5
आणि चौथ म्हणजे इडलीसाठी पीठ 12 तास फर्मेंटला म्हणजे आंबवायला ठेवायलाच हवं. तर डोशासाठी 6 तास पुरेसे आहेत, कारण तुम्ही यात दही घालूनही डोसा बनवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Idli Dosa Batter : तुम्हीही एकाच पिठापासून बनवता इडली, डोसा; इथंच चुकताय! साऊथ इंडियनने सांगितले 4 फरक