TRENDING:

Ambika Devi Yatra : नवसाला पावणारी अंबिका माता, महाराष्ट्रात इथं भरते मोठी यात्रा, नेमकी परंपरा काय?

Last Updated:

विविध धार्मिक सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमातून लाखोंची उलाढाल करणाऱ्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी भर ठरणाऱ्या अंबिका यात्रेची नेमकी परंपरा काय जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: सांगलीच्या घाटमाथ्यावरील पूर्वीचा खानापूर हा प्रसिद्ध तालुका आहे. कायम दुष्काळ असूनदेखील इथल्या लोकांच्या काबाडकष्टाने प्रसिद्ध असणाऱ्या तालुक्यास अंबिका देवीच्या यात्रेची समृद्ध परंपरा लाभली आहे. विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमातून लाखोंची उलाढाल करणाऱ्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी भर ठरणाऱ्या अंबिका यात्रेची नेमकी परंपरा काय जाणून घेऊया.
advertisement

यात्रा किंवा जत्रा हे आपल्या भारतीय समाज व्यवस्थेतील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यातही ग्रामीण समाज व्यवस्थेमध्ये जत्रांना धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व पहायला मिळते. यापैकीच धार्मिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करणारी सांगलीच्या जुन्या खानापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली श्री अंबिका देवीची यात्रा होय.

श्री अंबिका माता हे जुन्या खानापुरातील आणि सध्याच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेपासून अंबा मातेच्या यात्रेला सुरुवात होते. सलग बारा दिवस भरणाऱ्या या यात्रेमध्ये अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी जनावरांचे बाजार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आकर्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेचा उत्साह आजही तितकाच पाहायला मिळतो.

advertisement

Success Story : मामाचा सल्ला ऐकला अन् नोकरीचा राजीनामा दिला, गावकडच्या तरुणाची आता लाखात कमाई

बदलत्या काळाबरोबर खानापूर तालुक्याचे विभाजन झाले. जल-जमीन-पाणी यासह सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये देखील कितीतरी कायापालट झाला. परंतु इसवी सन 1300 सालापासून वांगी गावामध्ये एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे ग्रामदैवत श्री अंबिका मातेवर असणारी गावकऱ्यांची अपार श्रद्धा.

advertisement

वांगी गावाची ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबिका देवीच्या मंदिराविषयी मंदिराचे पुजारी निलेश गुरव व प्रकाश गुरव यांनी लोकल18 सोबत बोलताना पुरातन आख्यायिका सांगितली. त्याप्रमाणे; वांगी गावाशेजारील चिंचणी गावातील माळी नावाचे गृहस्थ तुळजापूरच्या भवानीमातेचे भक्त होते. ते भवानी मातेच्या दर्शनासाठी चिंचणीतून तुळजापूरला वाऱ्या करत होते. पुढे वाढत्या वयानुसार त्यांना तुळजापूरला जाणे-येणे त्रासाचे ठरू लागले.

advertisement

तेव्हा त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन तुळजापूरची भवानी माता भक्तासोबत आली. परंतु तू जिथे मागे वळून पाहशील तिथेच मी थांबेन अशी देवीची अट होती. आणि भक्त माळी यांनी वांगी गावापासून पुढे आल्यानंतर मागे वळून पाहिले. त्याच ठिकाणी देवीने आपले स्थान निश्चित केले. इसवी सन 1300 साली शेत नांगरताना देवीची स्वयंभू मूर्ती मिळाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

advertisement

तुळजापूरला जाणे थांबले; वांगीमध्येच देवीचे दर्शन

वांगी गावचे रहिवासी आणि श्री अंबिका मातेचे परंपरागत भक्त संजय सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री अंबिका माता नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. खानापूर परिसरातील अनेक लोक तुळजापूरला जाण्याऐवजी वांगीमध्येच श्री अंबिका देवीचे दर्शन घेतात. देवीचा महिमा जाणत असलेले कित्येक भक्त पंढरपूरच्या विठुरायाप्रमाणे वांगीच्या श्री अंबिका देवीची वारी करतात. संकटाच्या वेळी भक्तांचे मनोबल वाढवणारी, भक्तांमध्ये धैर्य निर्माण करणारी श्री अंबिका देवी वांगी गावासह पंचक्रोशी आणि संपूर्ण खानापूर परिसराचे श्रद्धास्थान राहिले आहे.

बारा बलुतेदारांना पालखीचा मान

दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री भव्य पालखी सोहळ्याने यात्रेची दिमाखात सुरुवात होते. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, यात्रा कमिटी यासह गावातील बारा बलुतेदार लोकांना यात्रेच्या पूजेचा विशेष मान असतो. पौर्णिमेच्या प्रकाशात पालखी प्रदक्षिणा, श्री अंबिका देवीचा जयघोष, पालखी भेट तसेच गावातील चावडीवरती महाआरती असे धार्मिक सोहळे साजरे होत असल्याची माहिती पुजारी नामदेव गुरव यांनी दिली. पालखीदर्शनासह बारा बलुतेदारांकडून वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतो. यावेळी संपूर्ण गाव ऐक्याने, भक्तीभावाने गावच्या चावडीवर श्री अंबिकादेवीचा जयघोष करत राहतो.

ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जॉबसोबत स्ट्रॉंग मॅन झाला साहिल, पावर लिफ्टिंगमध्ये केली कमाल, 2 गोल्ड मेडल
सर्व पहा

श्री अंबिकादेवीचे भक्त यात्रेच्या निमित्ताने आवर्जून दर्शनासाठी येतात. यानिमित्ताने अनेक वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते. गावकऱ्यांकडून भव्य जनावरांचा बाजार भरवण्याची परंपरा आहे. खानापूर परिसरातील प्रसिद्ध जनावरांचा बाजार भरवला जातो. याशिवाय अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा, गाव खेड्यांचे लाडके खेळ समजले जाणारे बैलगाडा शर्यत आणि भव्य कुस्त्यांच्या स्पर्धा देखील संपन्न होतात. श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे वांगीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये लाखोंची उलाढाल होत असल्याचे नागरिक सांगतात.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ambika Devi Yatra : नवसाला पावणारी अंबिका माता, महाराष्ट्रात इथं भरते मोठी यात्रा, नेमकी परंपरा काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल