पुणे : महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण 288 जागांसाठी 4140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोणत्या पक्षाचे सरकार येणार आणि आपल्या मतदारसंघांमध्ये कोण आमदार होणार ही चर्चा पाहायला मिळत आहे. 23 नोव्हेंबर रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल. परंतु राज्यातील सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदार संघामध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळाली.
advertisement
युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार इथे कोण जिंकेल याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. प्रसिद्ध ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी याबद्दलचं भाकीत व्यक्त केले आहे.
युगेंद्र पवार की अजित पवार, कोण मारणार बाजी?
अजित पवार यांची ग्रह स्तिथी पाहिली तर कुंभ राशी साडेसाती आहे. त्यांचा रवी कर्क राशीमध्ये आठव्या स्थानात शनी साडेसाती असून अतिशय संघर्ष करायला लावणारी आहे. मात्र या वेळी कदाचित अजित पवार यांना सहानुभुती मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार बारामतीमधून निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. बारामतीमध्ये अजित पवार हे युगेंद्र पवार यांच्यावरती एक निसटता विजय मिळवून आमदार होऊ शकतात.
पण सध्याचा आमदारा पेक्षा जास्त संख्या मिळवणे अजित पवारांना अवघड जाऊ शकत. त्यामुळे आता त्यांची जी परिस्थिती आहे उपमुख्यमंत्री तिच स्तिथी राहून पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकीत प्रसिद्ध ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024
सूचना - या बातमीत दिलेली माहिती ही ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.






