मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भाने त्यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी नवे दावे करणारी तसेच अनेक शंका उपस्थित करणारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी विमान कंपनीच्या कारभारावर शंका उपस्थित करीत विमानाच्या अवस्थेबद्दल काही रोखठोक प्रश्न विचारले.



