पुणे : चंद्र व स्पेस याविषयी सर्वांना नेहमी आकर्षण असते. मागच्या वर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले. आज या राष्ट्रीय अवकाश दिन दिनाचे निमित्त साधत लोणावळ्यातील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल व कल्पना चावला स्पेस अकादमी यांच्या वतीने शाळेमध्ये 1000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस कागदाच्या चांद्रयान तीनची प्रतिकृती बनवून नवा विक्रम केला.
advertisement
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल व कल्पना चावला स्पेस अकादमी यांच्या वतीने अवकाश दिनाचं औचित्य साधत तब्बल 1000 चांद्रयान 3 च्या कागदी प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनवत हा अनोखा उपक्रम राबवला आहे.
या विक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. हा दिवस कोणी साजरा करायचा या इस्रोच्या यादीमध्ये लोणावळ्यातील कल्पना चावला स्पेस अकादमीचा नामोल्लेख करण्यात आला आहे आणि याच निम्मिताने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
बाप्पाच्या मूर्तीला कस्टमाईझ ज्वेलरी बनवून घ्यायचीये?, तर मग पुण्यातील हे ठिकाण आहे एकच नंबर, VIDEO
या शाळेतील विद्यार्थ्यांना अवकाशातील अनेक गोष्टी दररोज शिकवल्या जातात. यामुळे या विद्यार्थ्यांना अवकाशातील बऱ्याच गोष्टींचे तसेच खगोलशास्त्राचे उत्तम ज्ञान आहे. कागदी यान बनवायला आम्हाला एवढी मेहनत घ्यावी लागली तर शास्त्रज्ञान्ना किती मेहनत करावी लागली असेल अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दोन तासाच्या वेळेमध्ये या विद्यार्थ्यांनी कागदापासून चांद्रयान 3 ची प्रतिकृती तयार केली. अतिशय कौशल्यपूर्ण असे हे काम होते . मी आज पेपरचे चंद्रयान बनवतो, पण मोठे झाल्यावर इस्त्रो आणि स्पेससाठी काम करेल, खरोखरचे चांद्रयान बनवेल हा विश्वास या मुलांमध्ये निर्माण करण्याचा आमचा मानस असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.