बाप्पाच्या मूर्तीला कस्टमाईझ ज्वेलरी बनवून घ्यायचीये?, तर मग पुण्यातील हे ठिकाण आहे एकच नंबर, VIDEO

Last Updated:

पूर्ण ड्रेपरी करण्यासाठी साधारण 500 ते 3 हजार रुपये खर्च येतो. आता सध्या याची मागणी वाढत आहे. त्याच पद्धतीने मुंबईच्या बाप्पाची क्रेझ वाढत आहे. इथे तुम्हाला शाडू माती आणि प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाहायला मिळतात.

+
गणेशोत्सव

गणेशोत्सव 2024

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : गणपती उत्सव आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. अनेक जण आपले गणपती हे आधीच बुक करून ठेवतात. तर काही जण हे गणपती आपल्या पसंतीने घेत असतात. पुण्यातील सुशांत डेरे हे गेली अनेक वर्षांपासून गणपती मूर्ती विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्याच पद्धतीने ते ग्राहकांना गणपतीवर हवी तशी ज्वेलरी बनवून देतात. तुम्हाही तुमच्या बाप्पाची मूर्ती हवी तशी बनवून घेऊ शकता. याठिकाणी नेमकं कशा पद्धतीने काम चालते, त्याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
पूर्ण ड्रेपरी करण्यासाठी साधारण 500 ते 3 हजार रुपये खर्च येतो. आता सध्या याची मागणी वाढत आहे. त्याच पद्धतीने मुंबईच्या बाप्पाची क्रेझ वाढत आहे. इथे तुम्हाला शाडू माती आणि प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाहायला मिळतात.
पुण्यातील कसबा पेठ या ठिकाणी मागील 35 वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत. येथे शाडू मातीपासून बनवलेली शास्त्रशुद्ध पद्धतीने मूर्ती घेण्यासाठी लोक येतात. लोकांचा आता ट्रेंडदेखील बदलतो आहे. गणपतीची ज्वेलरी, ड्रेपरी हे करून घेतात. एका मूर्तीला ड्रेपरी करण्यासाठी साधारण एक तासाचा कालावधी लागतो. तर मुंबई स्टाईल बापाची क्रेझ ही पुणेकरांना आता जास्त आहे.
advertisement
फेट्यासाठी 300 ते 700 रुपये खर्च येतो. तर धोतरसाठी 700 ते 800 आणि पूर्ण ड्रेपरी करण्यासाठी 1200 ते 2 हजार रुपये खर्च येतो. तसेच ज्वेलरी करायची असेल तर 500 ते 3 हजार रुपये खर्च येतो, असे त्यांनी सांगितले.
advertisement
बाप्पाची मूर्ती ही 900 रुपये ते 18 हजार रुपयांपर्यंत आहे. तर बाहेर राज्यामध्येही बाप्पाची मूर्ती ही पाठवतो. गुजरात, बंगळुरू, पाटणा त्याच प्रमाणे कारगिलमध्येही मूर्ती पाठवत असल्याची माहिती मूर्ती विक्रेते सुशांत डेरे यांनी दिली.
advertisement
मराठी बातम्या/पुणे/
बाप्पाच्या मूर्तीला कस्टमाईझ ज्वेलरी बनवून घ्यायचीये?, तर मग पुण्यातील हे ठिकाण आहे एकच नंबर, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement