advertisement

बॉयफ्रेंडसोबत लग्नावरून वाद, प्रसिद्ध युट्यूबरनं उचललं टोकाचं पाऊल, 21 व्या वर्षी संपवलं आयुष्य

Last Updated:

YouTuber Ends Life : वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी प्रसिद्ध युट्यूबरनं तिचं आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. 

News18
News18
सोशल मीडियाच्या जगातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध युट्यूबरचा मृत्यू झाला आहे. तिनं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच तिचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी तसंच फॅन्सना खूप मोठा धक्का बसला आहे. कोमली असं युट्यूबरचं नाव असून ती गेल्या अनेक वर्षांपासून युट्यूब क्षेत्रात नाव कमावत होती. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तिनं आयुष्य संपवलं. कोमलीच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
युट्यूबरच्या आत्महत्येचा संपूर्ण प्रकार हैद्राबादमध्ये घडला आहे. रिलेशनशिपच्या वादातून कोमलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोमली मूळची विशाखापट्टणमची असून ती बीएससीचे शिक्षण घेत होती. ती हैदराबादमधील मणिकोंडा येथील चित्रपुरी कॉलनीमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कोमलीचं निखिल रेड्डी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. निखिल रेड्डी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तोदेखील यूट्यूबर आहे. तोही मूळचा विशाखापट्टणमचा आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी निखिलने तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही कोमलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र कुटुंबीयांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला समजावलं होतं. अलीकडेच दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून वाद झाला होता. या वादामुळे त्यांच्यातील तणाव वाढल्याचं सांगितले जात आहे.
advertisement
सोमवारी घरात एकटी असताना कोमलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या आईने रायडुर्गम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोमलीच्या आत्महत्येची माहिती समोर आल्यानंतर तिच्या फॅन्सना खूप मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कोमलीला श्रद्धांजली वाहिनी आहे.
गेल्या काही महिन्यात अनेक युट्यूबर्सच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. काही महिन्यांआधी एका प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं ट्रेकिंगवेळी दरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
advertisement
काही दिवसांआधी प्रसिद्ध मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं. तो अनेक महिने आजारी होता. रक्तातील सफेद कावीळ झाल्याने प्रथमेशचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची आणि लहान बहिण आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉयफ्रेंडसोबत लग्नावरून वाद, प्रसिद्ध युट्यूबरनं उचललं टोकाचं पाऊल, 21 व्या वर्षी संपवलं आयुष्य
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement