TRENDING:

पुण्यात 19 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, जाता जाता मृत्यूचं सिक्रेट सोबतच घेऊन गेला, काय घडलं?

Last Updated:

पुण्याची पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुण्याची पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. त्याने घरात कुणीही नसताना हे टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने जीवन संपवताना आपल्या मृत्यूचं सिक्रेट सोबतच नेलं आहे. घटनास्थळी चिठ्ठी किंवा इतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. एका १९ वर्षीय युवकाने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
News18
News18
advertisement

अर्थव विजय देशमुख असं आत्महत्या करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पिंपरी चिंचवडच्या दिघी येथील गंगोत्री हॉस्पिटल जवळ पार्वती भोजने यांच्या घरात कुटुंबासोबत भाड्याने राहत होता. रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. तसेच त्याचा मोबाईल देखील फॉरमॅट केला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली? याचं गूढ निर्माण झालं आहे. तो आपल्या मृत्यूचं सिक्रेट सोबतच घेऊन गेला.

advertisement

ही घटना जेव्हा घडली, तेव्हा अथर्वची आई घरी नव्हती. ती घरी आली असता तिने दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अथर्वने प्रतिसाद न दिल्याने त्याची आई ज्योती देशमुख आणि शेजाऱ्यांनी खिडकीतून घराची कडी उघडून आत प्रवेश केला. त्याला तातडीने खाली उतरवून जवळच्या गंगोत्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी त्याला पिंपरी येथील वाय.सी.एम. रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणासोबत केली शेती, 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा, भोपळ्याच्या कसा केला प्रयोग?
सर्व पहा

पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. अथर्वच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्याने आत्महत्या पूर्वी आपला मोबाईल फोन हा फॉरमॅट केल्याने त्याच्या मृत्यूचं गूढ निर्माण झालं आहे. या घटनेचा अधिक तपास दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात 19 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, जाता जाता मृत्यूचं सिक्रेट सोबतच घेऊन गेला, काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल