TRENDING:

Pune News : अजितदादांचा शिलेदार पुन्हा पवारांच्या भेटीला, स्वागताचे फ्लेक्सही लावले; तरी भेट नाकारली, ठेवलं ताटकळत

Last Updated:

काही दिवसापूर्वीच अतुल बनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेला रंगल्या होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायचंद शिंदे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जुन्नर : अजित पवारांचे शिलेदार असलेले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. याआधीही गेल्या महिन्यात अतुल बेनके हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. अतुल बेनके विधानसभेआधी शरद पवार गटात जाण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. आज पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला आलेल्या अतुल बेनके यांना पवारांनी भेट नाकारल्याची माहिती समोर येत आहे. अतुल बेनके यांना शरद पवार यांनी ताटकळत ठेवलं.

advertisement

शरद पवार हे आज उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रात शरद पवार गेले होते. तिथं आमदार अतुल बेनके हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले. पण एका महिन्यात दुसऱ्यांदा बेटीसाठी आलेल्या अतुल बेनके यांना शरद पवार यांनी भेट नाकारली. त्यांना मागच्या लाइनमध्ये ताटकळत ठेवले. याचे व्हिडीओसुद्धा समोर आले आहेत.

advertisement

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या हस्ते आज ओतूर येथे स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शरद पवार ओतूरमध्ये येत असल्याने अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांच्याकडून स्वागताचे फोटो लावण्यात आले. या स्वागताच्या फोटोमध्ये अजित पवार यांचे फोटो नाहीत.

काही दिवसापूर्वीच अतुल बनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेला रंगल्या होत्या. त्यानंतर अतुल बेनके यांनी खुलासा देत मी अजित पवार गटातच राहणार असल्याचे सूचक वक्तव्य केलं होतं. मात्र त्यानंतर आज शरद पवार हे जुन्नर तालुक्यात येत असताना त्यांच्या स्वागताचे बॅनर ओतूर येथे पाहायला मिळत आहेत.

advertisement

जुन्नरच्या राजकारणात आता अतुल बेनके यांची शरद पवार यांनी भेट नाकारल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या महिन्यातील दौऱ्यावेळीही शरद पवार यांनी अतुल बेनके यांना फटकारले होते. कोण अतुल बेनके असं शरद पवार म्हणाले होते. अतुल बेनके यांनी जुलै महिन्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी तेव्हा अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, सीटसाठी नेते असं करत असतात, भेट घेतली तर काय झालं?

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : अजितदादांचा शिलेदार पुन्हा पवारांच्या भेटीला, स्वागताचे फ्लेक्सही लावले; तरी भेट नाकारली, ठेवलं ताटकळत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल