पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर दोन जणांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केले आहेत. पीडित तरुण भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात मोबाईल गेम खेळत होता. याच वेळी दुचाकी वरून आलेल्या चार पैकी दोन जणांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पण पोलिसांनी दोन्ही आरोपींसह त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
advertisement
करण शिवाजी जमादार (वय १९. रा. सिंहगड महाविद्यालयाजवळ, वडगाव बुद्रुक), शुभम साधू चव्हाण (वय १९, रा. रियांश सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जखमी तरुणाच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मुलगा ४ सप्टेंबर रोजी मित्रांबरोबर मोबाइलवर गेम खेळत होता. त्या वेळी आरोपी करण, शुभम आणि दोन अल्पवयीन साथीदार तेथे दुचाकीवरून आले. आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.