छत्रपती संभाजीनगर शहरातील इंटॅकच्या वतीने दर रविवारी शहरातील विविध ऐतिहासिक ठिकाणी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात येते. या वॉकची सुरुवात 2014 पासून झालेली आहे. डॉ. रफत आणि दुलारी कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉकची सुरुवात करण्यात आलेली आहे. या वॉक अंतर्गत शहरातील जी ऐतिहासिक स्थळे आहेत, या ठिकाणी जाऊन त्या स्थळाबद्दल सर्व माहिती देण्यात येते.
advertisement
पहिल्या हेरिटेज वॉकची सुरुवात ही भडकल गेटपासून करण्यात आली होती. त्यानंतर टाऊन हॉल, रंगीन दरवाजा, दिल्ली गेट असा हा वॉक होता. सकाळी सात वाजता सुरू करण्यात आलेला वॉक हा दुपारी दीड वाजेपर्यंत चालला होता, असं डॉ. दुलारी कुरेशी यांनी सांगितलं आहे.
आम्हाला असं वाटलं होतं की, आम्ही सुरू केलेल्या या वॉकला 25-30 लोक येतील अशी आमची अपेक्षा होती, पण पहिल्याच वॉकला संख्या शंभर ते दीडशे लोकांची झाली होती. त्यानंतर सातत्याने हे काम चालू आहे. पहिल्या हेरिटेज वॉकला कमिशनर देखील आले होते, तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की, दुसरा वॉक कुठे असणार आहे? तेव्हा आमचं असं काही ठरलं नव्हतं किंवा कुठे करायचं पण तेव्हा आम्ही त्यांना सांगून दिलं की, बीबी का मकबरा. परत बीबी का मकबराला वॉक झाला. त्यानंतर परत विचारलं तर, पुढचा वॉक कुठे आहे? तेव्हा आम्ही सांगितलं की, औरंगाबाद लेणी. असं करत करत या वॉकची सुरुवात झाली आहे, असं दुलारी कुरेशी म्हटले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील दर रविवारी विविध ऐतिहासिक ठिकाणी या वॉकचे आयोजन करण्यात येतं. सकाळी सात ते नऊ पर्यंत या वॉकचे आयोजन करण्यात येतं. यामध्ये त्या वारसा स्थळाबद्दल सर्व माहिती सांगण्यात येते.