Bhendi Bazaar : मिळतात सगळे अँटिक पीस, पण नाव भाजीचं; मुंबईतील भेंडी बाजारचं भेंडीशी कनेक्शन काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bhendi Bazaar Name Story : मुंबईतील एक खूप जुनी बाजारपेठ ज्याचं नाव आहे 'भिंडी बाजार किंवा भेंडी बाजार'. पण इथं भेंडीत काय कोणतीच भाजी नाही तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात. मग या जागेचं नाव भाजीवरून का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
खरंतर हा बाजार ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटीश काळात या ठिकाणाचं नाव बिहाइंड द बझार असं होतं. पण मुंबईत राहणाऱ्या मूळ लोकांच्या ओठावर येताच त्याचं नाव बदललं, भेंडीबाजार झालं. हिंदी भाषिक भिंडीबाजार असं म्हणू लागले. तेव्हापासून सगळे या मार्केटला भेंडीबाजार किंवा भिंडीबाजार म्हणूनच ओळखतात. इथं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील लोकप्रिय भेंडीबाजार घराणा देखील आहे.








