T20 World Cup : फोर-सिक्स नाही, 2 रननी जिंकली इंग्लंड, गेम कसा झाला? पाकिस्तानला कळलंच नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये इंग्लडने पाकिस्तानचा 2 विकेटने पराभव केला आहे. याचसोबत इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे.
पल्लेकेले : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये इंग्लडने पाकिस्तानचा 2 विकेटने पराभव केला आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 164 रन केले. पाकिस्तानकडून साहिबझादा फरहानने 45 बॉलमध्ये 63 रन केले, तर बाबर आझमने 24 बॉलमध्ये 25, फकर झमानने 25 आणि शादाब खानने 23 रनची खेळी केली. इंग्लंडकडून लियाम डॉसनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्चरला 2, जेमी ओव्हरटनला 2 आणि आदिल रशीदला 1 विकेट मिळाली.
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला पहिल्याच बॉलला धक्का बसला. फिल सॉल्ट शाहिन आफ्रिदीच्या बॉलिंगवर शून्य रनवर आऊट झाला. यानंतर पुढच्याच ओव्हरला शाहिनने जॉस बटलरला 2 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये आफ्रिदीनेच जेकब बेथलचीही विकेट घेतली, त्यामुळे इंग्लंडची अवस्था 35/3 झाली. यानंतर उस्मान तारीकने त्याच्या पहिल्याच ओव्हरला टॉम बॅन्टनला आऊट केलं, यानंतर इंग्लंडचा स्कोअर 58/4 होता.
advertisement
एका बाजूने विकट जात असतानाही इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने एकट्याने किल्ला लढवत झुंजार शतक ठोकलं. ब्रुकने 51 बॉलमध्ये 196.08 च्या स्ट्राईक रेटने 10 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 100 रनची खेळी केली. विल जॅक्सने 28 आणि सॅम करनने 16 रन करून हॅरी ब्रुकला साथ दिली. या सामन्यात इंग्लंडने फार फोर आणि सिक्स मारल्या नसल्या तरी त्यांनी दोन-दोन रन करून स्कोअरबोर्ड हलता ठेवला.
advertisement
विकेट जात असतानाही इंग्लंडने पाकिस्तानच्या संथ फिल्डिंगचा आणि पल्लेकेलेच्या मोठ्या मैदानाचा फायदा घेतला. इंग्लंडने इनिंगमध्ये 14 वेळा 2-2 रन काढल्या, ज्यामुळे कोणताही धोका न पत्करता इंग्लंडच्या खात्यात 28 रन आल्या. या महत्त्वाच्या 28 रनमुळे इंग्लंडचा रिक्वायर रन रेट हा कधीच हाताच्या बाहेर गेला नाही आणि त्यांनी अडचणीत असतानाही 5 बॉल राखून सामना जिंकला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 11:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : फोर-सिक्स नाही, 2 रननी जिंकली इंग्लंड, गेम कसा झाला? पाकिस्तानला कळलंच नाही!






