New Book: वाचनप्रेमींसाठी मोठी पर्वणी, कोणतेही पुस्तक मिळतेय अर्ध्या किमतीत, मुंबई हे आहे ठिकाण, Video

Last Updated:

ही संधी खास करून विद्यार्थ्यांपासून ते पुस्तकप्रेमींपर्यंत सर्वांसाठीच पर्वणी ठरत आहे. वाचनसंस्कृती जपणाऱ्या आणि पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा खजिना आहे.

+
CSMT

CSMT जवळ पुस्तकांचा खजिना – वाचा हवे ते, अर्ध्या किमतीत!

मुंबई : मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात पुस्तकप्रेमींना आकर्षित करणारी एक विशेष संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई विद्यापीठासमोर लावण्यात आलेल्या एका पुस्तक स्टॉलवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील असंख्य नवीन पुस्तके अत्यंत स्वस्त दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. ही संधी खास करून विद्यार्थ्यांपासून ते पुस्तकप्रेमींपर्यंत सर्वांसाठीच पर्वणी ठरत आहे. वाचनसंस्कृती जपणाऱ्या आणि पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा खजिना आहे.
या पुस्तक स्टॉलवर व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शं. ना. नवरे, नागनाथ कोत्तापल्ले, मंगला गोडबोले यांच्यासारख्या साहित्य दिग्गजांची लोकप्रिय पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ययाती, प्रतिपचंद्र, बहिर्जी, युगंधर, रावण, छावा, झुंजारराव, श्रीमान योगी यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचीही येथे रेलचेल आहे.
advertisement
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्व पुस्तके पूर्णपणे नवीन स्वरूपात आहेत, जुन्या किंवा वापरलेल्या नाहीत. तरीही दर अत्यंत किफायतशीर ठेवण्यात आला आहे. 500 रुपयांपर्यंतच्या मूळ किमतीची पुस्तके फक्त 250 रुपयांमध्ये तर काही खास निवडक पुस्तके फक्त 150 रुपयांत उपलब्ध आहेत.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. अभ्यासाव्यतिरिक्त वाचन करण्याची सवय लावण्यासाठी आणि चांगल्या साहित्याशी संपर्क साधण्यासाठी अशी संधी फारच मोलाची ठरते.
advertisement
या स्टॉलवरील पुस्तकांची मांडणी आकर्षक असून, साहित्यप्रकारांनुसार केलेली वर्गवारी वाचकांना हवे ते पुस्तक सहज सापडण्यास मदत करते. कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, प्रेरणादायक पुस्तके, ऐतिहासिक साहित्य आणि काल्पनिक कथा अशा विविध प्रकारांमध्ये भरपूर पर्याय येथे उपलब्ध आहेत. मुंबईच्या गडबडीत थोडा वेळ बाजूला काढून, या पुस्तक स्टॉलला भेट दिल्यास साहित्याच्या अमूल्य खजिन्याचा आनंद घेता येईल.
मराठी बातम्या/मुंबई/
New Book: वाचनप्रेमींसाठी मोठी पर्वणी, कोणतेही पुस्तक मिळतेय अर्ध्या किमतीत, मुंबई हे आहे ठिकाण, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement