Mumbai AC Local : मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार, MRVC कडून 2856 वंदे मेट्रो डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू

Last Updated:

Mumbai AC Local : मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखीनच गारेगार होणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये लवकरच बदल होणार आहे. आधुनिकि‍करणासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे.

AC Local: लोकलच्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार? 21 हजार कोटी खर्चून 238 एसी लोकलची खरेदी
AC Local: लोकलच्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार? 21 हजार कोटी खर्चून 238 एसी लोकलची खरेदी
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखीनच गारेगार होणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये लवकरच बदल होणार आहे. आधुनिकि‍करणासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. सध्या, उपनगरीय रेल्वे मार्गावर 12 डब्यांच्या बहुतेक लोकल तर, 15 डब्यांच्या काही प्रमाणातच लोकल चालवल्या आहे. आता लवकरच 18 डब्ब्यांची लोकल धावणार आहे. पण ही एसी लोकल असणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे एसी वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दिर्घकालीन देखभालीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (MRVC) 2856 एसी वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दिर्घकालीन देखभालीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. एमआरव्हीसीकडून आलेल्या निविदेमध्ये 12, 15 आणि 18 डबे धावणार आहेत. यामुळे प्रवासी क्षमता, सोय आणि सुरक्षा यात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत चाललेल्या गर्दीमुळे एमआरव्हीसीने लोकल डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल सेवांचा आणि आवश्यकतेनुसार १८ डब्यांच्या लोकलचा समावेश केला जाईल. आधुनिक वंदे मेट्रो डबे पुरवण्या सोबतच पुढचे ३५ वर्ष वंदे मेट्रोच्या देखभालीवरही भर दिला जाणार असल्याची माहिती एमआरव्हीसीकडून मिळत आहे.
advertisement
६ सप्टेंबर २०२५ रोजी (शनिवारी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) फेज तीन- तीन ए अंतर्गत निविदा काढण्यात आली. आधुनिक वंदे मेट्रो डबे पुरवण्या सोबतच पुढचे ३५ वर्ष वंदे मेट्रोच्या देखभालीवरही भर दिला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथे दोन अत्याधुनिक देखभाल- दुरूस्ती आगारे विकसित केले जाणार आहेत. निविदा सादरीकरण ८ डिसेंबरपासून सुरू होईल. तर, निविदा उघडण्याची तारीख २२ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. ही निविदा मेक इन इंडिया धोरणानुसार राबवली जाणार आहे. ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन- तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात समावेश होईल. करार झाल्यानंतर दोन वर्षात पहिला प्रोटोटाईप रॅक मुंबईत दाखल होईल.
advertisement
वंदे मेट्रोचे डबे हे वातानुकूलित आणि पूर्णपणे वेस्टिब्यूल्ड रॅक असणार आहे. जास्त त्वरण (Acceleration) आणि ब्रेकिंग क्षमता त्यामध्ये असणार आहे. वेळेवर धावण्यासाठी उपयुक्त असणार आहे. सुरक्षेसाठी स्वयंचलित दरवाजे बंद प्रणाली देण्यात येणार आहे. आधुनिक आतील सजावट, मऊ आसने, मोबाइल चार्जिंग पॉईंट आणि माहितीप्रद प्रणाली असणार आहे. या लोकलची १३० किमी प्रति तासापर्यंत वेग क्षमता असेल. दोन्ही टोकांना विक्रेत्यांसाठी डबे असणार आहे. मुंबईच्या हवामानातील प्रवाशांच्या आरामाची खात्री करणे असे उच्च क्षमतेचे एचव्हीएसी या लोकलमध्ये असतील. या लोकलमध्ये जागतिक दर्जाच्या सुरक्षा प्रणाली असेल. ज्यात सुधारित ब्रेकिंग आणि प्रवासी प्रवाह डिझाईनचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai AC Local : मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार, MRVC कडून 2856 वंदे मेट्रो डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement