advertisement

T20 World Cup : टीम इंडियाचं मिशन वर्ल्ड कप सुरू, आफ्रिकेविरुद्ध सूर्याने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे, पण त्याआधी टीम इंडिया फक्त एक सराव सामना खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये हा सामना होत आहे.
1/6
2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात सगळ्या टी-20 सीरिज जिंकल्या आहेत, जो एक विश्वविक्रम आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार झाल्यापासून भारताची टी-20 क्रिकेटमधली विजयी टक्केवारी 84 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

2/6
टी-20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा हा आयसीसी क्रमवारीमध्ये नंबर वन खेळाडू आहे, तर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा नंबर वन टी-20 बॉलर आहे, यावरून टी-20 क्रिकेटमधलं भारताचं वर्चस्व दिसून येतं.

3/6
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. सराव सामना असल्यामुळे दोन्ही टीमना प्लेइंग इलेव्हन जाहीर करावी लागणार नाही. जास्तीत जास्त खेळाडूंना मॅच प्रॅक्टिस मिळावी म्हणून 11 पेक्षा जास्त खेळाडू खेळू शकतात.

4/6
टीम इंडियाने 2024 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सर्व सीरिज जिंकल्या असल्या तरी संजू सॅमसनचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये संजूने 10 पेक्षा कमीच्या सरासरीने रन केल्या.

5/6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सराव सामन्यात संजू सॅमसन पुन्हा अपयशी ठरला, तर त्याला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला युएसएविरुद्ध होणार आहे.

6/6
भारतीय टीम : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement