advertisement

Congress : एका झटक्यात सात नगरसेवकांचं निलंबन, काँग्रेसमध्ये खळबळ, हर्षवर्धन सपकाळांनी उगारला कारवाईचा बडगा

Last Updated:

Congress : काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षादेश धाब्यावर बसवत भाजपला साथ दिली असल्याचे चित्र दिसून आले. अशा नगरसेवकांवर काँग्रेसकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

एका झटक्यात ७ नगरसेवकांचं निलंबन, काँग्रेसमध्ये खळबळ, हर्षवर्धन सपकाळांनी उगारला कारवाईचा बडगा
एका झटक्यात ७ नगरसेवकांचं निलंबन, काँग्रेसमध्ये खळबळ, हर्षवर्धन सपकाळांनी उगारला कारवाईचा बडगा
मुंबई: नुकत्याच पार पाडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला काही ठिकाणी चांगलं यश मिळालं. मात्र, निकालानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षादेश धाब्यावर बसवत भाजपला साथ दिली असल्याचे चित्र दिसून आले. अशा नगरसेवकांवर काँग्रेसकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. काँग्रेसने आपल्या सात नगरसेवकांवर एका झटक्यात कारवाई केली. याआधी काँग्रेसने अंबरनाथमध्येही अशीच कारवाई केली होती.
जालना महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य नियुक्ती प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत करणे काँग्रेसच्या सात नगरसेवकांना महागात पडले आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या सातही सदस्यांना पक्षातून निलंबित केले आहे. या संदर्भातील अधिकृत 'कार्यालयीन आदेश' प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

जालना महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या सात सदस्यांनी आपल्याच पक्षाच्या ध्येयधोरणांना बगल देत भाजपच्या उमेदवारांना मदत केल्याची धक्कादायक बाब चौकशी अहवालातून समोर आली. या सदस्यांनी पक्षादेश (व्हीप) धाब्यावर बसवून उघडपणे भाजपला सहकार्य केले, यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
advertisement

कोणावर झाली कारवाई?

निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे:
१. फारूक सादीक तुंडीवाले
२. इमरान खान आमानुलला खान
३. फरहाना अ. रऊफ अंसारी
४. सुनिल अशोक बोरडे
५. मयूरी दिनेश देने
६. रुबीना मजीद पठाण
७. अनिल अशोक तिरुखे

पक्षात शिस्तीचा बडगा

काँग्रेस पक्षाने या कारवाईद्वारे राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांनाही कडक इशारा दिला आहे. "पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असा संदेश या निलंबनातून देण्यात आला आहे. या सातही सदस्यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. जालन्यामध्ये भाजपला मदत करणाऱ्या या नगरसेवकांची पुढची राजकीय दिशा काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress : एका झटक्यात सात नगरसेवकांचं निलंबन, काँग्रेसमध्ये खळबळ, हर्षवर्धन सपकाळांनी उगारला कारवाईचा बडगा
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement