Diwali Special Train: दसरा-दिवाळी घरीच साजरी होणार! नागपूरकरांची रेल्वेने केली भारी सोय

Last Updated:

Diwali Special Train: रेल्वे प्रशासनाने दसरा आणि दिवाळीसाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Diwali Special Train: दसरा-दिवाळी घरीच साजरी होणार! नागपूरकरांची रेल्वेने केली भारी सोय
Diwali Special Train: दसरा-दिवाळी घरीच साजरी होणार! नागपूरकरांची रेल्वेने केली भारी सोय
मुंबई: पुढील काही दिवसांत शारदीय नवरात्रौत्सव, दसरा आणि दिवाळी हे सण आहे. सणासुदीच्या काळात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतून लोक आपापल्या मूळ गावी जातात. परिणामी या काळात वाहतुक व्यवस्थेवर ताण येतो. विशेषत: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने सणासाठी विशेष ट्रेन चालवण्याच्या निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने दसरा आणि दिवाळीसाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरसाठी पुणे आणि मुंबईतून प्रत्येकी 20 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
नागपूर-पुणे-नागपूर
गाडी क्रमांक 01209 नागपूर ते पुणे: ही गाडी 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर 2025२ या कालावधीत दर शनिवारी नागपूर येथून सुटेल. नागपूर स्टेशनवरून ही विशेष गाडी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल.
advertisement
गाडी क्रमांक 01210 पुणे ते नागपूर: 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात ही विशेष गाडी प्रत्येक रविवारी पुण्यातून सुटेल. ही गाडी पुणे स्टेशनवरून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. या दोन्ही ट्रेन उरळी, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर (अहमदनगर), बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव, वर्धा या स्टेशन्सवर थांबतील.
advertisement
लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस
गाडी क्रमांक 02139 लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर: 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या काळात प्रत्येक गुरुवारी ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन धावेल. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी नागपूरच्या दिशेने निघेल.
गाडी क्रमांक 02140 नागपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस: 26 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी ही गाडी नागपूरहून धावेल. ही ट्रेन दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघेल. या ट्रेन ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, वडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्टेशन्सवर थांबतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diwali Special Train: दसरा-दिवाळी घरीच साजरी होणार! नागपूरकरांची रेल्वेने केली भारी सोय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement