पुण्याच्या हवेली येथील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे सांगळे निलंबित करण्यात आले आहे. पुण्यात पशुसंवर्धन विभागाची १५ एकरच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. मंत्री बावनकुळेंकडून महसूल विभागाची झाडाझडती घेण्यास सुरुवात झाली आहे. गैरव्यवहार करणारऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दट्टा बसण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
काय म्हटले आहे शासन आदेशात?
पुणे जिल्ह्यातील ताथवडे गावातील शासकीय ताब्यातील जमीन विक्रीस नोंदवण्याच्या प्रक्रियेत गैरव्यवहाक झाल्याने प्रभारी दुय्यम निबंधक विद्या शंकर बडी (सांगळे) यांना निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणात ताथवडे येथील सर्वे नं. 20 मधील 6 हेक्टर 32 आर क्षेत्राची जमीन विक्रीचा दस्त क्रमांक 685/2025 दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी नोंदविण्यात आला होता. मात्र, नोंदणी करताना अद्ययावत 7/12 उतारा जोडला नव्हता. दस्तासोबत 2023 मधील जुना 7/12 जोडण्यात आला होता, ज्यावर शासनाचा ताबा किंवा विक्रीवरील बंदीचा उल्लेख नव्हता.चौकशीत समोर आले की फेब्रुवारी 2025 मधील अद्ययावत 7/12 उताऱ्यावर आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असून शासनाच्या परवानगीशिवाय विक्रीस बंदी” असा स्पष्ट शेरा होता. तरी देखील दुय्यम निबंधकांनी तांत्रिक अडचणीमुळे म्युटेशन होत नव्हते म्हणून ‘स्किप ऑप्शन’ वापरून दस्त नोंदविला. परंतु यासाठी त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतलेली नव्हती.
ही गंभीर अनियमितता मानून विद्या शंकर बड़े (सांगळे) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अंतर्गत 12 नोव्हेंबर 2025 पासून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई येथे राहील आणि त्यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
