नेमकं प्रकरण काय?
वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दत्ता काळे नावाच्या आरोपीनं कोमकर टोळीची रेकी केली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची जेव्हा कसून चौकशी केली गेली. तेव्हा तो आंबेगाव पठार परिसरात एका घरात भाड्याने राहत असल्याचं समोर आलं. दत्ता काळेला बेकायदेशीरपणे घर भाड्याने देणाऱ्या महिलेविरुद्ध पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी सारंग कर्डेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार येथील गजानन कॉलनीतील एका ३८ वर्षीय महिलेने आपल्या चाळीतील खोली आंदेकर टोळीतील सराईत गुन्हेगार दत्ता बाळू काळे याला भाड्याने दिली होती. ३० ऑगस्ट रोजी ५ हजार रुपये अनामत रक्कम घेऊन ही खोली भाड्याने दिली होती आणि दरमहा ३ हजार रुपये भाडे ठरले होते.
पोलिसांच्या आदेशाचा भंग
गृहनिर्माण मालकांनी कोणत्याही भाडेकरूला घर भाड्याने देण्यापूर्वी पोलीस ठाण्यात त्याची माहिती देणे आणि भाडेकरार करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, या महिलेने या नियमांचे उल्लंघन केले. तिने दत्ता काळेसोबत कोणताही भाडेकरार केला नव्हता. कोणतंही ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे देखील घेतली नव्हती. शिवाय अशाप्रकारे भाडेकरू ठेवला आहे, याची माहिती देखील त्यांनी पोलिसांना दिली नव्हती. महिलेच्या या एका चुकीमुळे आयुषचा गेम झाल्याचं सांगितलं जातंय.
खरं तर, कोणत्याही भाडेकरूला घर देताना भाडेकरार करणं आणि याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना देणं बंधनकारक आहे, असं असताना संबंधित महिलेनं पोलिसांच्या आदेशाचा भंग केला. त्यामुळे दत्ता काळेला भाड्याने घर देणाऱ्या घरमालकिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.