बॅनरमध्ये काय लिहिलंय?
या बॅनरमधून अजित पवारांवर प्रश्न उपस्थित केला आहे. फोटोशॉपमध्ये एडिट करून तयार केलेलं अधारकार्ड आणि इतर दस्त बनवणे गुन्हा नाही का? असा सवाल यातून विचारला आहे. हा गुन्हा नसेल तर पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि पूजा खेडकर चुकीचे कसे काय? असंही विचारण्यात आलं आहे.
महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आमची फसवणूक करणारी शिंदे नावाची महिला आणि तिचे कुटुंब इतके दिवस कारवाईपासून कुणामुळे वाचले. या वेश्येला पोसतोय कोण? असा सवाल या बॅनरमधून विचारण्यात आला आहे. तसेच भारतीय नागरिकत्व ओळख पत्राशी छेडछाड करणं देशद्रोह नाही का? असा सवालही विचारण्यात आला आहे. हा बॅनर दौंड शहर परिसरात लावला आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, महेश चोरमले नावाच्या व्यक्तीने शिंदे नावाच्या महिलेवर गंभीर आरोप केला आहे. संबंधित महिलेनं बनावट आधार कार्ड बनवून तिने खरेदी खताचा दस्त बनवला आणि आपली जमीन हडपली, असा आरोप संबंधित व्यक्तीने केला आहे. याबाबत महसूल विभागाकडे तक्रार करूनही योग्य ती कार्यवाही होत नाही. याच कारणामुळे त्याने हा बॅनर लावला आहे. पण या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देखील उल्लेख असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.