हा हल्ला इतका भयंकर होता की यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: कोंढवा पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. हा धक्कादायक प्रकार समोर येताच पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. दिलावर सिंग असं अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे. तर मेरी तेलगू असं हत्या झालेल्या २६ वर्षीय प्रेयसीचं नाव आहे.
advertisement
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलावर सिंग आणि मेरी तेलगू दोघंही मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. १०ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता. त्यामुळे दोघंही वाकड परिसरात भेटले. दिलावरने वाकड येथील एका लॉजवर प्रेयसी मेरी तेलगूचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासात ११ ऑक्टोबर रोजी प्रियकर दिलावर सिंग याने मेरीवर चाकू आणि ब्लेडने वार करून तिची हत्या केली.
मेरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेरी ही डी-मार्टमध्ये काम करत होती. तर दिलावर हा हॉटेल व्यावसायिक आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. हत्येनंतर आरोपी दिलावर सिंग याने थेट कोंढवा पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.