TRENDING:

उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? मग प्रवासाचं टेन्शन सोडा; मध्य रेल्वेच्या 2012 स्पेशल ट्रेन, कुठून कुठं? पाहा सविस्तर

Last Updated:

Central Railway: मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून 2 हजार 12 उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: उन्हाळी सुट्टीत अनेकजन आपल्या गावी जात असतात. त्यामुळे याकाळात रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून 2 हजार 12 उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, हडपसर आणि दौंड येथून 1 हजार 13 उन्हाळी गाड्यांचे नियोजन असून प्रवाशांच्या मागणीनुसार जादा 56 गाड्याही सोडण्यात येणार आहेत.
उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? मग प्रवासाचं टेन्शन सोडा; मध्य रेल्वेच्या 2012 स्पेशल ट्रेन, कुठून कुठं? पाहा सविस्तर
उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? मग प्रवासाचं टेन्शन सोडा; मध्य रेल्वेच्या 2012 स्पेशल ट्रेन, कुठून कुठं? पाहा सविस्तर
advertisement

पुणे–कोल्हापूर–पुणे दरम्यान विशेष रेल्वे गाडी 15 एप्रिल ते 15 जुलै या कालावधीत धावणार असून या काळात एकूण 184 फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01023 ही पुणे येथून दररोज रात्री 9.50 वाजता सुटेल आणि कोल्हापूरला पहाटे 5.08 वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01024 कोल्हापूरहून रात्री 11.30 वाजता सुटून पुण्यात पहाटे सुमारे 4.45 वाजता पोहोचेल. या गाडीला सासवड रोड, जेजुरी, निरा, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले, रुकडी, वळिवडे आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे.

advertisement

पुणे रेल्वेचा हायस्पीड धमाका! 925 पैकी 588 किमी दुहेरीकरण पूर्ण; आता या महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांचा प्रवास सुसाट

हडपसर–हरंगुळ–हडपसर विशेष गाडी

View More

याच कालावधीत हडपसर–हरंगुळ–हडपसर विशेष गाडीच्या देखील 184 फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01487 हडपसर येथून सकाळी 6.20 वाजता सुटेल आणि हरंगुळ येथे दुपारी 12.50 वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01488 हरंगुळहून दुपारी 3 वाजता सुटून हडपसर येथे रात्री 8.45 वाजता पोहोचेल. या मार्गावर रुक्षी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, मुरुड आदी स्थानकांवर थांबे असतील.

advertisement

विविध मार्गांवर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन

पुणे–गोरखपूर–हडपसर या विशेष गाडीच्या एकूण 32 फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी 28 फेऱ्या प्रवाशांच्या मागणीनुसार चालवल्या जातील. पुणे–गाझीपूर सिटी–हडपसर या द्विसाप्ताहिक गाडीच्या 8 फेऱ्या होणार आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तृतीयपंथी नेमकं कोण? ‘त्या’ विधेयकानं वातावरण तापलं, LGBTQ समुदाय रस्त्यावर, का होतोय विरोध, Video
सर्व पहा

पुणे–दानापूर–हडपसर या दैनिक गाडीच्या 184 फेऱ्या होणार असून त्यातील 28 फेऱ्या मागणीनुसार चालतील. पुणे–नागपूर–हडपसर या साप्ताहिक गाडीच्या 54 फेऱ्यांचेही नियोजन आहे. दौंड–कलबुर्गी–दौंड या अनारक्षित गाडीच्या 183 फेऱ्या होतील. तर सोलापूर–दौंड–सोलापूर या दैनिक गाडीच्या 184 फेऱ्या होणार आहेत. तसेच मुंबई (एलटीटी)–सोलापूर–मुंबई या साप्ताहिक गाड्या 21 एप्रिल ते 15 जुलै दरम्यान 26 फेऱ्या होतील. या गाड्यांना पुणे आणि दौंड येथे थांबे असतील.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? मग प्रवासाचं टेन्शन सोडा; मध्य रेल्वेच्या 2012 स्पेशल ट्रेन, कुठून कुठं? पाहा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल