TRENDING:

Weather Update: महाराष्ट्रात वारं बदललं, थंडीचा कडाका आता कुठे वाढणार? हवामानाची नवी अपडेट्स

Last Updated:

राज्यातील वातावरणात पुन्हा बदल घडून आले आहेत. प्रमुख शहरांतील किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडीचा जोर काहीसा कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : जानेवारीच्या सुरवातीपासूनच राज्यात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गेले काही दिवस थंडीचा कडाका कायम होता. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत 8 जानेवारीला राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा जोर काहीसा कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement

राज्यात पुढील काही दिवस किमान तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 8 जानेवारीला मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये निरभ्र आकाश असणार अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.

पुण्यामध्ये 8 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पुण्यातील किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिक मध्ये 8 जानेवारीला निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. नाशिक मधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. राज्यात सर्वात कमी किमान तापमान हे नाशिक मध्ये असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

advertisement

विदर्भातील नागपूरमध्ये 8 जानेवारीला अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. विदर्भात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम असणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू! परंपरेला फाटा, महाराष्ट्रात या कार्यक्रमाचीच चर्चा
सर्व पहा

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. राज्यातील सर्व प्रमुख शहरातील किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Weather Update: महाराष्ट्रात वारं बदललं, थंडीचा कडाका आता कुठे वाढणार? हवामानाची नवी अपडेट्स
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल