TRENDING:

मुद्याची लढाई, गुद्यावर! काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजप कार्यकर्ते दामगुडेंनी केली मारहाण, घटनेचा VIDEO

Last Updated:

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हनुमंत पवार यांना पुण्यात मारहाण झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : एरव्ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे भाजप आणि काँग्रेसचे नेते रस्त्यावर मारामारी करत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे  काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे प्रवक्ते तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवून हनुमंत पवार यांना मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
News18
News18
advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हनुमंत पवार यांना पुण्यात मारहाण झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. पुण्यातील दैनिक पुढारीच्या कार्यालयासमोर असलेल्या मित्र मंडळ चौकामध्ये मारहाण करण्यात आली. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, भाजपचे नेते तुषार दामगुडे आणि त्यांच्या समर्थकांनी हनुमंत पवार यांना गाठलं आणि मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

advertisement

advertisement

या व्हिडीओमध्ये तुषार दामगुडे दिसत आहे. सर्वात आधी तुषार दामगुडे यांनी हनुमंत पवार यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या ५ कार्यकर्त्यांनी मिळून पवार यांना मारहाण केली, यावेळी उपस्थितीत असलेल्या इतर कार्यकर्त्याने पवार यांना वाचवलं.

तुषार दामगुडेला लगेच अटक करा -सपकाळ

दरम्यान,  हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये आरोप केला आहे की, भाजप गुंड तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत हनुमंत पवार यांना मारहाण केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरूंगात टाकण्यात यावे, त्याची खरी जागा तीच आहे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

advertisement

अद्याप गुन्हा दाखल नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

या प्रकरणानंतर पुण्यातील काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अद्याप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार किंवा गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार अशी माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
मुद्याची लढाई, गुद्यावर! काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजप कार्यकर्ते दामगुडेंनी केली मारहाण, घटनेचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल