TRENDING:

Pune Budget Meals : हॉस्टेलवर राहता किंवा बॅचलर आहात? पुण्यातील 'या' ठिकाणी फक्त 50 रुपयात स्वादिष्ट जेवण मिळवा!

Last Updated:

Pune Budget Meals : पुण्यातील प्रत्येक बजेट-फ्रेंडली व्यक्तीसाठी एक अद्भुत संधी आहे. फक्त 50 रुपयात तुम्ही इथे पोटभर स्वादिष्ट आणि ताजे जेवण घेऊ शकता. या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या उपलब्ध आहेत, ज्यात तुम्हाला घरच्यासारखी चव अनुभवायला मिळेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र मानले जाते. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरासोबतच उद्योगधंद्यांमध्येही याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे देशभरातून तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून विद्यार्थी आणि तरुण-तरुणी शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरीसाठी पुण्यात येतात. परंतु, येणाऱ्या प्रत्येकाला जेवणासाठी मोठा खर्च सहन करावा लागतो. आता पुण्यातील एका ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या किंवा नोकरीसाठी आलेल्यांसाठी फक्त 50 रुपयात भरपेट जेवण मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, हे ठिकाण खरेतर कुठे आहे.
News18
News18
advertisement

चिंचवडच्या एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलजवळ आता खानदेशी जेवणाचा अनुभव घेणे खूप सोपे आणि परवडणारे झाले आहे. फक्त 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या थाळ्यांमध्ये तुम्हाला खानदेशी चवीचा खरा स्वाद मिळतो. या ठिकाणी खानदेशी पद्धतीने तयार केलेले जेवण, पारंपरिक मसाल्यांसह, अगदी घरच्या सारखे वाटते. खानदेशी भावाने खास तुमच्यासाठी आणलेले जेवण फक्त परवडणारे नाही, तर स्वादिष्ट देखील आहे.

advertisement

इथे तुम्हाला 10 प्रकारच्या थाळ्या फक्त 50 ते 130 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. थाळीमध्ये असलेल्या पदार्थांची गुणवत्ता आणि चव यामुळे एकदा खाल्ल्यावर तुम्ही नक्कीच आवडून टकाल. उडीद आणि नाचणीचे पापड, पाटोडी भाजी, डाळ खिचडी, पुलाव आणि अनेक प्रकारच्या शेवभाजी येथे मिळतात. प्रत्येक पदार्थ ताज्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला असतो, त्यामुळे खानदेशी जेवणाचा अनुभव अगदी खऱ्या घरच्या जेवणासारखा वाटतो.

advertisement

किंमत अजूनही अत्यंत परवडणारी आहे. उदाहरणार्थ वरण वट्टी थाळी फक्त 100/- रुपयांमध्ये (शनिवार आणि रविवार उपलब्ध) आणि अनलिमिटेड कडी खिचडी गुरुवारी फक्त 80/- रु मध्ये मिळते. या थाळ्यांमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात जेवण मिळते आणि त्यामुळे पैसे वाचतात.

याचबरोबर, इथे ठेचा भाकरी देखील उपलब्ध आहे जी अतिशय चविष्ट आहे. भाकरीसह खाल्ला तर जेवणाचा अनुभव अधिक आनंददायी होतो. खानदेशी मसाले आणि पारंपरिक पदार्थांच्या चवीसाठी इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकदा नक्कीच परत येण्याची इच्छा होते.

advertisement

कुटुंबांसाठी आणि ग्रुपसाठी बसण्याची उत्तम सोय देखील उपलब्ध आहे. मोठ्या गटांसह जेवणाचा आनंद घेता येतो. एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल जवळील ही ठिकाणं खानदेशी जेवणासाठी आदर्श ठिकाण आहे जिथे तुम्ही स्वादिष्ट जेवण आणि परवडणाऱ्या किमतीचा अनुभव घेऊ शकता.

एकंदर, हे ठिकाण चिंचवडमध्ये खानदेशी जेवणासाठी एक उत्तम पर्याय ठरले आहे. ताज्या, पारंपरिक आणि परवडणाऱ्या जेवणासोबत, तुम्ही आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह आरामात जेवू शकता. इथे येऊन एकदा खाल्ल्यावर तुम्ही नक्कीच परत येण्याची इच्छा ठेवाल, कारण येथे जेवण खरेच पोटभर आणि मनापासून स्वादिष्ट आहे.

advertisement

जर तुम्हाला खानदेशी चवीचा अनुभव घ्यायचा असेल, तर एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलजवळील हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. फक्त 50 रुपयांपासून सुरू होणारी थाळी आणि विविध प्रकारचे जेवण तुम्हाला घरच्या सारखे स्वाद देईल.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Budget Meals : हॉस्टेलवर राहता किंवा बॅचलर आहात? पुण्यातील 'या' ठिकाणी फक्त 50 रुपयात स्वादिष्ट जेवण मिळवा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल