रेल्वे प्रशासनाने गाड्यांचे विभाजन केल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या विशेष गाड्या 25 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान धावणार आहेत. या काळात दिवाळी, छठपूजा आणि अन्य सण एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी उत्तर भारत, विदर्भ तसेच इतर राज्यांकडे प्रवास करतात.
हडपसर आणि खडकी स्थानकांचा विकास
advertisement
पुणे स्थानकावर फलाट मिळण्यात अडचण येते. त्यामुळे गाड्या उशिरा सुटतात. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षभरात रेल्वे प्रशासनाने हडपसर आणि खडकी स्थानकांवर मोठे काम केले. हडपसर येथे आधीच पाच फलाट आहेत.मात्र, सर्वांचे काम पूर्ण नव्हते. आता ते पूर्णत्वास गेले आहे. खडकी स्थानकावरदेखील फलाटची उंची वाढवून प्रवाशांना चढणे-उतरणे सोपे केले आहे. यामुळे पुणे स्थानकाचा भार कमी होणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांनाही त्यांच्या जवळच्या स्थानकावरून गाडी पकडण्याची सुविधा मिळेल.
1)पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या विशेष गाड्या
पुणे-दानापूर (दैनिक, गाडी क्र. 01449)
पुणे-दानापूर (सोमवार व शुक्रवार, गाडी क्र. 01481)
पुणे-गोरखपूर (दैनिक, गाडी क्र. 01415)
पुणे-हजरत निजामुद्दिन (मंगळवार व शनिवार, गाडी क्र. 01483)
पुणे-हजरत निजामुद्दिन (शुक्रवार, गाडी क्र. 01491)
पुणे-हजरत निजामुद्दिन (सोमवार व गुरुवार, गाडी क्र. 01493)
पुणे-सांगानेर (बुधवार, गाडी क्र. 01433)
पुणे-सांगानेर (गुरुवार व रविवार, गाडी क्र. 01411)
पुणे-सांगानेर (शुक्रवार, गाडी क्र. 01405)
पुणे-अमरावती (मंगळवार, गाडी क्र. 01403)
पुणे-गाझीपूर (गुरुवार व मंगळवार, गाडी क्र. 01431)
2)हडपसर स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या
हडपसर स्थानकावरून प्रवाशांसाठी अनेक गाड्या उपलब्ध असतील.
हडपसर-दानापूर (सोमवार, गाडी क्र. 03214)
हडपसर-झाशी जंक्शन (रविवार, गाडी क्र. 01923)
हडपसर-झाशी जंक्शन (गुरुवार, गाडी क्र. 01925)
हडपसर-लातूर (सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार – गाडी क्र. 01210)
हडपसर-नागपूर (रविवार – गाडी क्र. 01210)
हडपसर-नागपूर (गुरुवार व शुक्रवार – गाडी क्र. 01202)
हडपसर-बिलासपूर (गुरुवार – गाडी क्र. 08266)
3)खडकी स्थानकावरून विशेष गाडी
खडकी स्थानकावरूनदेखील एक गाडी धावणार आहे –
खडकी-हिसार (सोमवार, गाडी क्र. 04726)
प्रवाशांना मोठा फायदा
या निर्णयामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होईल. हडपसर आणि खडकी परिसरातील प्रवाशांना थेट स्थानिक स्थानकावरून गाडी पकडता येणार आहे. त्यामुळे फलाटावरील गर्दी कमी होईल आणि गाड्या वेळेत सुटतील. रेल्वे प्रशासनाने केलेल्या या नियोजनामुळे दिवाळीत प्रवास अधिक सोपा, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.