TRENDING:

एक पुण्यात तर दुसरा मुंबईत; दोन तरुणांचं मिळून धक्कादायक कांड, झडती घेताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Last Updated:

पथकाने सुरुवातीला अतुल बालगुडे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ४ लाख २० हजारांचे अमली पदार्थ सापडले. त्याच्या चौकशीतून या ड्रग्ज साठ्याचा मुख्य पुरवठादार मुंबईतील असल्याचे समोर आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पिंपरी-चिंचवडच्या वाकड आणि हिंजवडी परिसरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. हिंजवडी पोलिसांनी वाकड परिसरात सापळा रचून तब्बल २० लाख रुपये किमतीचे एम.डी. (मेफेड्रोन) आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. यात एकूण २७ लाख ७५ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पुणे आणि मुंबईतील दोन तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अतुल शंकर बालगुडे (वय ३५, रा. पाथरगाव, मावळ) आणि त्याचा मुंबईतील साथीदार शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी (रा. गोवंडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुणे-मुंबई कनेक्शन असलेल्या दोघांना बेड्या (प्रातिनिधिक फोटो)
पुणे-मुंबई कनेक्शन असलेल्या दोघांना बेड्या (प्रातिनिधिक फोटो)
advertisement

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पथकाने सुरुवातीला अतुल बालगुडे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ४ लाख २० हजारांचे अमली पदार्थ सापडले. त्याच्या चौकशीतून या ड्रग्ज साठ्याचा मुख्य पुरवठादार मुंबईतील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने मुंबईतील गोवंडी परिसरातून शारुख अन्सारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपयांचा एम.डी. साठा हस्तगत केला. या संपूर्ण कारवाईत एकूण २४२ ग्रॅम एम.डी., एक चारचाकी वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

advertisement

बारामतीत नीरा नदीत मृत्यूचा थरार! अचानक नदीकाठी लाखो मृत माशांचा खच, आसपासच्या गावातील लोक भयभीत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, ऋषीकेश घाडगे आणि सहाय्यक निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली. या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध जाळ्याला चाप बसणार असून पुणे-मुंबई कनेक्शनच्या अधिक तपासासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
एक पुण्यात तर दुसरा मुंबईत; दोन तरुणांचं मिळून धक्कादायक कांड, झडती घेताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल