पुणे : राज्य निवडणूक आयोगाने महानगपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर उमेदवारांची लगबगवाढली आहे. काही पक्षांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. जाहीर झालेले उमेदवार आपला उमेदवारी अर्जही भरत आहेत. मात्र पुण्यातून एक अजब प्रकार समोर आळा आहे. उमेदवारी अर्ज करण्यासाठी एका उमेदवाराने चिल्लर आणली आहे, त्याने आणलेली नाणी मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फुटला आहे. पुण्यातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
advertisement
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 (ड) घोरपडी पेठ–गुरुवार पेठ–समताभूमी येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या गणेश किरण खानापुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असलेली अमानत रक्कम त्यांनी थेट चिल्लर नाण्यांमधून भरली. नोटांऐवजी केवळ नाणी आणल्यामुळे निवडणूक कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक
गणेश खानापुरे मोठ्या पिशव्यांमध्ये चिल्लर घेऊन निवडणूक कार्यालयात दाखल झाले. नियमांनुसार अमानत रक्कम स्वीकारणे बंधनकारक असल्याने अधिकाऱ्यांना ती रक्कम मोजावी लागली. मात्र नाण्यांची संख्या इतकी मोठी होती की ती मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. बराच वेळ या प्रक्रियेत गेला. नाण्यांचे संख्या पाहता अधिकारीही क्षणभर अवाक झाले.
कार्यालयातील कामकाज काही काळ खोळंबले
या प्रकारामुळे कार्यालयातील कामकाज काही काळ खोळंबले होते. तथापि, सर्व नाणी मोजून अमानत रक्कम पूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतर खानापुरे यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला. या अनोख्या प्रकारामुळे उपस्थित नागरिक, कर्मचारी आणि इतर उमेदवारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती.
नागरिकांनी जमा केलेल्या पैशांमधून भरला अर्ज
गणेश खानापुरे यांनी यामागचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, सामान्य माणसाकडे रोजच्या व्यवहारातून जमा झालेली चिल्लरच अधिक असते. निवडणूक प्रक्रियेत सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व व्हावे, हा संदेश देण्यासाठीच मी अमानत रक्कम नाण्यांमधून भरली. नागरिकांनी त्यांना जमेल तसे पैसे दिले तेच आज मी भरले आहे. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही निवडणूक मी जिंकणार आहे. पुण्यातील या अनोख्या घटनेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून, महानगरपालिका निवडणुकांपूर्वीच रंगत वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
हे ही वाचा :
