ए गोविंदा...झोपलाय तो, पप्पा आलेत, उठायला सांग
गणेश कोमकरने त्याचा मृतदेह पाहताच म्हणाला की, 'ए गोविंदा... परत ये... झोपलाय तो, पप्पा आलेत, उठायला सांग त्याला. हे काय झालं, चूक नसतानाही माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली', असे गणेश कोमकर पोलिसांकडे बघून म्हणाला. त्यानंतर गणेश कोमकर बराच वेळ रडत होता. त्यावेळी गणेश कोमकरचे हुंदके थांबत नव्हते. "बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी…" असं म्हणत गणेशने हुंदके देत आपल्या मुलाच्या पार्थिवाला निरोप दिला.
advertisement
आय लव्ह यू पप्पा
गणेश कोमकरने आपल्यासोबत एक ग्रिटींग कार्ड आणलं होतं. हे ग्रिटींग कार्ड आयुषने बापाला जेलमध्ये असताना पाठवलं होतं. "आय लव्ह यू पप्पा" असं लिहिलेलं हे कार्ड होतं. तर एक पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट देखील होता. अंत्यसंस्कारावेळी आयुषचे कुटुंबीय, भावंडे, नातेवाईक उपस्थित होते. त्याच्या भावाने आणि आईनेही प्रचंड आक्रोश केला.
वनराज हत्या प्रकरण
दरम्यान, वनराजच्या हत्या प्रकरणात आयुषचे वडील गणेश कोमकर, काका जयंत कोमकर आणि काकी संजीवनी कोमकर हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आयुषवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी पॅरोलची मागणी केली होती. मात्र, फक्त आयुषच्या वडिलांना पॅरोल मिळाली. त्याच्या काकाला आणि काकीला पॅरोल दिलं गेलं नाही.