वाहतुकीतील महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग
आळंदी फाटा (चाकण) कडून प्रवेश बंदी: चाकण बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद असेल. ही वाहने मोशीतील भारतमाता चौक मार्गे डावीकडे वळून, देहूफाटा चौकातून उजवीकडे वळून जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक आणि भोसरी-मॅगझीन चौक मार्गे पुढे जातील.
तो केरळचा; बँकॉकहून पुण्याला आला; विमानतळावर उतरताच चेहरा बघून संशय, अन् तपासणीत धक्कादायक कांड उघड
advertisement
चाकणकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी: चाकण चौक (आळंदी) येथून इंद्रायणी हॉस्पिटल चौक मार्गे चाकणकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. ही वाहने बोपदेव चौक, चिंबळी फाटा आणि पुणे-नाशिक महामार्गाचा वापर करू शकतील.
याव्यतिरिक्त जड वाहनांना जोग धर्मशाळा, चाळीस फुटी चौक, वडगाव रस्ता आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरून वळवण्यात आले आहे. प्रशासनाने वाहनचालकांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
