नेमकं प्रकरण काय?
केशवकुमार महतो (वय २६, मूळ रा. बिहार, सध्या रा. चिखली) असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो आणि संशयित आरोपी पुनीत राम नक्षत्र शुक्ला (वय २८, मूळ रा. बिहार) हे दोघेही वाल्हेकरवाडी येथे एका घराच्या दुरुस्तीचे काम करत होते. कामाच्या दरम्यान त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पुनीतने संतापून केशवकुमारला दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली ढकलून दिलं. उंचावरून पडल्याने केशवकुमारला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून संशयित आरोपी पुनीत शुक्ला याला तातडीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा (IPC 302/BNS) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
एकाच राज्यातील असूनही केवळ क्षुल्लक वादातून एका तरुणाने दुसऱ्याचा अशाप्रकारे जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
