मोबाईल चेक करणं जिवावर बेतले
मिळालेल्या माहितीनुसार, ही घडलेली घटना चिखली येथील जाधववाडी येथील आहे. जिथं एक कुटुंब आपल्या 16 वर्षीय मुलीसह गेल्या काही काळापासून वास्तव्यास होते. पण 22 मार्च आधी मुलगी घरात असताना वडिलांनी सहज तिचा मोबाईल तपासण्यासाठी मागितला आणि तो तपासला. वडिलांनी मोबाईल तपासल असल्याचा राग या मुलीला आला आणि तिने रागाच्या भरात विश प्राशन केले.
advertisement
या प्रकरानंतर तिला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरुही केले. मात्र मुलीची प्रकृती गंभीर असल्याने 22 मार्च रोजी तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अचनाक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 9:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Shocking Incident : बापाने लेकीचा मोबाईल तपासला आणि होत्याचं नव्हतं झालं; पिंपरीतील घटनेने सर्वजण सुन्न
